AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Qualities of July Born Babies : गुणी बाळ गं ते ! जुलैमध्ये जन्मलेली मुलं का असतात खास? वाचून तर पाहा !

प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये काही खास गुण असतात. प्रत्येक मुलाची वैशिष्ट्यं वेगळी असतात. पण जुलै महिन्यात जन्माला आलेल्या मुलांचे खास वैशिष्ट्य काय असते ते जाणून घेऊ.

Qualities of July Born Babies : गुणी बाळ गं ते ! जुलैमध्ये जन्मलेली मुलं का असतात खास? वाचून तर पाहा !
जुलैमध्ये जन्मलेली मुलं का असतात खास?
| Edited By: | Updated on: Jul 07, 2022 | 5:00 PM
Share

प्रत्येक मूल जन्माला येताना स्वभाव व काही गुणवैशिष्ट्ये ( Qualities) घेऊन येतो. या सर्व गोष्टी त्याच्या जन्मवेळेशी संबंधित असतात. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर होणाऱ्या अनेक प्रभावांबाबत सांगितले आहे. त्यामध्ये ग्रह, नक्षत्रांपासून प्रत्येक महिन्याबाबत वर्णन असते. म्हणजेच एखादे मूल ज्या महिन्यात जन्माला येते, त्या महिन्याचा प्रभाव त्या मुलाचा स्वभाव आणि व्यक्तीमत्वावर पडत असतो. ते लक्षात घेऊनच मुलांचे संगोपन करणे गरजेचे असते. जुलै महिन्यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा ( Famous Persons) वाढदिवस असतो. त्यामध्ये क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, गायक कैलाश खेर, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात जन्माला आलेल्या मुलांचे गुणवैशिष्ट्य (Qualities of July Born Baby) काय असते, ती कशी असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, कोणत्या ग्रहाचा, नक्षत्राचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांची खास वैशिष्ट्ये

सर्व कामे टापटिपीने करतात

जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कामात एकदम चोख असतात. त्यांची सर्व कामे अतिशय नीट, टापटीप असतात. या व्यक्ती अतिशय मेहनती, आपले काम अतिशय चोख रितीने करतात. त्यांच्या अंगात धाडसही खूप असते. जुलै बॉर्न व्यक्तींना जेवण बनवणे, नाचणे आणि ड्रायव्हिंगची खूप आवड असते.

व्यवहार कुशल असतात

जुलै महिन्यात ज्यांचा जन्म होतो, ती मुलं वा त्या व्यक्ती व्यवहारात अतिशय कुशल असतात. जीवनाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय प्रॅक्टिकल आणि लॉजिकल ( Practical And Logical) असतो. त्यांची तर्कसंगती तर अतिशय उत्तम असते. या व्यक्ती कोणतंही काम करताना वास्तवाचे भान राखून आणि तर्कशुद्ध पद्धतीने करतात. त्यामुळे त्यांचे सर्व व्यवहार अतिशय चोख आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळतात. ते अतिशय जिज्ञासू असतात.

अतिशय पॉझिटिव्ह असतात

जुलै महिन्यात ज्यांचा वाढदिवस असतो, अशा व्यक्ती अतिशय सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह मनोवृत्तीच्या असतात. परिस्थिती कोणतीही असो, निराश न होता, खचून न जाता, या व्यक्ती त्याकडे सकारात्मकतेने पाहतात. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवरही सकारात्मक परिणाम होतो व तेही पॉझिटिव्ह विचारसरणीचे होतात.

कुटुंबाशी जोडलेले राहतात

जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी कुटुंबाशी जोडलेले राहतात. कुटुंबातील व्यक्तींसोबत राहणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे अशा व्यक्तींन खूप प्रिय असते. मुख्य म्हणजे कुटुंबासंदर्भात ते खूप संवेदनशील असतात.

मूडी असतात

जुलै महिन्यात ज्यांचा जन्म होतो त्या व्यक्तींच्या मूडचा काही भरवसा देता येत नाहीत. त्यांचे खूप मूड स्विंग्स (Mood Swings) होत असतात. एका क्षणात राग तर दुसऱ्या क्षणी आनंद, असा त्यांचा स्वभाव असतो. मात्र ते आपलं दु:ख किंवा आनंद सहज हाताळू शकतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.