AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे!

डाळिंबाच्या लाल-लाल रसाळ बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. इतकंच नाही तर हे खाल्ल्याने तुमचं वजनही झपाट्याने कमी होतं. पण आज आम्ही तुम्हाला डाळिंब खाण्याचे अनेक फायदे, तोटे सांगणार आहोत.

डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे!
pomegranate fruits
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 25, 2023 | 10:25 PM
Share

मुंबई: डाळिंबासाठी एक प्रसिद्ध म्हण आहे- ‘एक अनार सौ बीमार’. असंही म्हटलं जातं की, जर एखादी व्यक्ती रोज एक डाळिंब खात असेल तर तो लवकर आजारी पडत नाही. डाळिंब खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. मात्र डाळिंब आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. डाळिंब शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ओळखले जाते. हे खाल्ल्याने शरीरात झटपट एनर्जी देखील येते. डाळिंबाच्या लाल-लाल रसाळ बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. इतकंच नाही तर हे खाल्ल्याने तुमचं वजनही झपाट्याने कमी होतं. पण आज आम्ही तुम्हाला डाळिंब खाण्याचे अनेक फायदे, तोटे सांगणार आहोत.

डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला होणारे नुकसान-

1. डाळिंबाचे सेवन केल्याने फायदा होतो असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. अनेकदा डाळिंब खाल्ल्याने लोक आजारीही पडतात. जर तुम्ही हिवाळ्यात डाळिंब खात असाल तर दिवसा खा. थंडीत डाळिंब खाल्ल्याने सर्दी होऊ शकते. त्याचबरोबर पावसाळ्यातही डाळिंबाचे सेवन दिवसाच करावे.

2. डाळिंबामुळे काही लोकांचे नुकसान होते. खरं तर जर तुम्ही डाळिंबाचे जास्त सेवन करत असाल तर तुम्ही अतिसाराचे शिकार होऊ शकता. तसेच अतिसाराची समस्या असल्यास अशा परिस्थितीत डाळिंब खाऊ नये.

3. डाळिंबामुळे काही लोकांना स्किन ॲलर्जीचा त्रास होतो. त्यामुळे डाळिंबाचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. गरजेपेक्षा जास्त डाळिंब खाल्ल्याने रक्तदाबही कमी होतो. त्यामुळे कमी रक्तदाब असणाऱ्यांनी डाळिंबाचे सेवन करू नये.

डाळिंब खाण्याचे फायदे

1. डाळिंबाच्या फळात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. डाळिंब खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या किंवा कोलेस्टेरॉल जमा होत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. डाळिंब उच्च रक्तदाबावरही उपयुक्त आहे.

2. मधुमेहाच्या समस्येमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. डाळिंबामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स हंगामी आजारांशी लढण्यास मदत करतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!