रंगांसोबत खेळण्याआधी त्वचेचं करा संरक्षण, जाणून घ्या ‘या’ स्किन केअर टिप्स

होळी आणि धुळवड हा सण आपल्यासोबत खूप आनंद घेऊन येतो. तसेच धुळवडच्या दिवशी रंगांमध्ये अनेक प्रकारचे केमिकल मिक्स केलेले असतात आणि ते आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. या लेखात आपण धुळवड खेळण्याआधी तुमची त्वचेची कश्याप्रकारे काळजी घ्याल ते जाणून घेऊयात.

रंगांसोबत खेळण्याआधी त्वचेचं करा संरक्षण, जाणून घ्या या स्किन केअर टिप्स
Holi 2026:
| Edited By: | Updated on: Mar 01, 2026 | 12:08 AM

होळीचा सण रंग, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. तसेच रंगपंचमीच्या दिवशी रंगांसोबत खेळताना सर्वांना खुप मज्जा येते. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण हा सण उत्साहात साजरा करतात. पण हा सण जितका आनंद देतो तितकाच त्वचेसाठीही आव्हानात्मक देखील असतो. कारण आजकाल बाजारातून मिळणाऱ्या रंगांमध्ये खूप जास्त केमिकलचा वापर केला जातोय. ज्यामुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि संवेदनशील बनू शकते. कधीकधी ॲलर्जी, खाज सुटणे, पुरळ येणे आणि रंगद्रव्य यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून रंगपंचमी खेळण्यापूर्वी त्वचेची योग्य पद्धतीने संरक्षण करणे महत्वाचे आहे. जर त्वचेची काळजी आधीच घेतली तर रंगांचा परिणाम कमी होतो आणि त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते.

रंगांसोबत खेळण्याआधी तुमच्या त्वचेचे पोषण करणे, तिला मॉइश्चरायझेशन ठेवणे आणि योग्य सुरक्षा खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या लेखात, आपण काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्या केमिकलयुक्त रंगांमुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

‘डबल मॉइश्चर लॉक’ उपायांचा करा अवलंब

रंगांसोबत खेळण्यापूर्वी फक्त क्रीम लावल्याने तुमची त्वचा मॉइश्चरायझ होत नाही. रंगांचा प्रतिकार करण्यासाठी तुमच्या त्वचेला डबल मॉइश्चरायझिंग लॉकची आवश्यकता असते. हे करण्यासाठी, प्रथम हलके हायड्रेटिंग जेल किंवा एलोवेरा जेल लावा. नंतर जाड मॉइश्चरायझर किंवा नारळाच्या तेलाचा पातळ थर लावा. यामुळे त्वचेवर एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे रंग थेट त्वचेत जाण्यापासून रोखले जातात.

बर्फाने त्वचा टाइट करा

बर्फ त्वचेसाठी देखील खूप चांगला मानला जातो. यासाठी धुळवड खेळण्यापूर्वी तुम्ही तुमची त्वचा घट्ट करण्यासाठी चेहऱ्यावर बर्फ लावू शकता. हे करण्यासाठी 10-15 मिनिटे तुमच्या चेहऱ्यावर बर्फ हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे छिद्रे घट्ट होतात आणि रंग त्यांच्यात जाण्यापासून रोखला जातो. तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही गुलाबपाणी बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून त्याचे क्युब तयार करा आणि ते त्वचेवर लावा.

सनस्क्रीन लावणे

रंगपंचमीच्या दिवशी किमान SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले वॉटर-रेझिस्टंट सनस्क्रीन त्वचेवर लावा. धुळवड खेळण्यापूर्वी 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावा जेणेकरून ते त्वचेत शोषले जाईल. ते तुमच्या मानेला, कानांना आणि हातांनाही लावायला विसरू नका.

ओठ आणि डोळ्यांची काळजी दुर्लक्षित करू नका

धुळवड खेळण्यापूर्वी प्रत्येकजण आपल्या त्वचेचे रक्षण करण्याची तयारी करतो, परंतु अनेकदा आपण ओठांना आणि डोळ्यांना विसरून जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या ओठांना लिप बाम किंवा पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावू शकता. दरम्यान, तुमच्या डोळ्यांभोवती हलकी आय क्रीम, नारळ तेल किंवा बदाम तेल लावा. यामुळे तुमच्या डोळ्यांभोवती एक संरक्षक कवच तयार होईल.

नैसर्गिक स्किन बॅरियर मास्क

धुळवडच्या एक दिवस आधी, दही, मध आणि हळदीचा हलका फेसपॅक लावा. हे त्वचेला आतून पोषण देते आणि नैसर्गिक चमक आणते. यामुळे त्वचा मजबूत होते आणि रंगांमुळे होणारे नुकसान कमी होते. रंगांसोबत खेळल्यानंतर क्लींजरने तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us