गुडघेदुखीने त्रस्त आहात? रामदेव बाबांनी सांगितली सोपी आसने, 10 मिनिटात मिळेल आराम

Ramdev Baba : गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास काही काळानंतर गुडघ्याची हाडे आणि सांधे कमकुवत होतात. मात्र तुम्ही रामदेव बाबांनी सांगितलेली आसने करून 10 मिनिटांमध्ये आराम मिळवू शकता.

गुडघेदुखीने त्रस्त आहात? रामदेव बाबांनी सांगितली सोपी आसने, 10 मिनिटात मिळेल आराम
Rambev Baba Knee Pain
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 06, 2025 | 6:34 PM

बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना चाळीशीमध्येच गुडघेदुखीचा त्रास सुरु होतो. गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहणे, वजन उचलणे, चुकीच्या पद्धतीने चालणे किंवा जास्त हालचाल केल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. काही काळानंतर गुडघ्याची हाडे आणि सांधे कमकुवत होतात. यामुळे दैनंदिन कामे करणेही कठीण होऊन जाते. आज आपण गुडघेदुखीवर सोपा उपाय जाणून घेणार आहे. गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रामदेव बाबांनी काही आसने सांगितली आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

गुडघ्यात रक्तपुरवठा कमी झाल्यास गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. मात्र रामदेव बाबांनी अशी आसने सांगितली आहेत, ज्यामुळे गुडघ्यांमधील रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे सांधे मजबूत होऊन गुडघे निरोगी राहतात. या योगासनांमुळे स्नायू आणि लवचिक बनतात, ज्यामुळे दुखापत आणि वेदना होण्याचा धोका कमी होतो. या आसनांमुळे गुडघ्यांमध्ये असलेला कडकपणा आणि सूज कमी होते. यासाठी रामदेव बाबांनी सुचवलेली योगासने कोणती आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विरासन

रामदेव बाबा यांनी सांगितले की, विरासन केल्याने गुडघे आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. या आसनामुळे गुडघ्यांच्या सांध्यातील लवचिकता वाढते, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

मकरासन

मकरासनामुळे शरीराला आराम मिळतो आणि आणि गुडघ्यांभोवतीच्या स्नायूंमधील ताण कमी करते. यामुळे गुडघ्यांमधील कडकपणा आणि वेदना कमी होतात व गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

त्रिकोणासन

त्रिकोणासन केल्याने पायाच्या आणि गुडघ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. हे आसन गुडघ्याच्या सांध्याला बळकट करते आणि त्याची हालचाल सुलभ करते.

मालासन

मालासनामुळे गुडघे आणि कंबरेचे स्नायू लवचिक बनतात. या आसनाचा नियमित सराव केल्यास गुडघेदुखी कमी होते आणि सांधे मजबूत होतात.

गुडघ्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही काळजी घ्या

  • दररोज हलका व्यायाम करा आणि दररोज चालणे गरजेचे आहे
  • वजन नियंत्रणात ठेवा, यामुळे गुडघ्यावर जास्त ताण येत नाही
  • जास्त वेळा एका स्थितीत बसू नका
  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करणारा संतुलित आहार घ्या.
  • जंक फूड, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
  • गुडघ्याचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी चांगली विश्रांती घ्या आणि शांत झोप घ्या.