
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. बरेच लोक बसून काम करतात, त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली खुप कमी झाल्या आहेत. मात्र याचा आरोग्यावर अनेकदा हानिकारक परिणाम होऊ शकतो. अनेकांच्या शरीरातील ताकद कमी झालेली आहे. यासाठी आपण दररोज व्यायाम केला पाहिजे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून थोडा वेळ काढून योगाभ्यास केला पाहिजे. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी योगगुरूरामदेव बाबांनी काही आसने सांगितली आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
योगगुरू बाबा रामदेव यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी काही योग आसनांची माहिती दिली आहे. या व्हिडिओला त्यांनी “हनुमानजींसारखी शक्ती कशी मिळवायची” असे कॅप्शन दिले आहे. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी त्यांनी तीन आसने सांगितली आहेत. यातील पहिले आसन हे हनुमान आसन आहे. हे आसन करणे खूप सोपे आहे. यात एक पाय पुढे आणि एक पाय मागे ठेवायचा. त्यानंतर दोन्ही हात खाली टेकवायचे आणि कंबर आणि मान हळूहळू मागे वाकवायचे. यामुळे कंबर आणि कंबरेची लवचिकता सुधारते. तसेच पायांचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते.
शरीरातील ताकद वाढवण्यासाठी रामदेव बाबांनी हनुमान दंडासन करण्यात सांगितले आहे. हे आसन करण्यासाठी प्रथम जमिनीवर पोटावर झोपा आणि दोन्ही हात खांद्याखाली ठेवा. तुमचे पाय सरळ करा आणि पायाची बोटे जमिनीवर ठेवा. आता, तुमच्या हातांचा वापर करून, तुमची छाती आणि शरीर जमिनीपासून वर उचला. त्यानंतर तुमचा उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे सरकवा. दोन्ही पाय शक्य तितके रुंद पसरवा. तुमची कंबर सरळ आणि तुमची नजर समोर ठेवा. हात जमिनीवर टेकवून संतुलन बनवा. त्यानंतर पोट आत खेचा. हा संपूर्ण क्रिया पूर्ण झाल्यानंतर हळूहळू तुमचे शरीर पु्न्हा सामान्य स्थितीत आणा.
baba-ramdev-yoga
रामदेव बाबांच्या मते भुजंगासन दररोज करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आसन करताना योगा मॅटवर पोटावर झोपा. दोन्ही पाय सरळ ठेवा आणि तुमचा पंजे मागच्या बाजूला वळवा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर ठेवा. त्यानंतर छाती आणि पोट वर उचला. तुमच्या नाभीपर्यंतचा भाग जमिनीवर ठेवा. तुमचे कोपर अर्ध्या वाकलेल्या असस्थेत असतील. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर मूळ जागेवर परत या. दरम्यान, नेहमी शरीराच्या क्षमतेनुसार योगासन करावे, योगासन करताना योग तज्ञ सोबत असणे अधिक फायदेशीर ठरेल.