Poor Eyesight : अंधूक दिसतंय? मग शरीरात आहे ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता, कसा असावा आहार? वाचा टीप्स…

| Updated on: Sep 13, 2022 | 12:48 PM

आजकाल कमकुवत दृष्टीची समस्या झपाट्याने वाढत आहे. लहान वयात कमकुवत दृष्टीमुळे लोक त्रस्त होतात. अशा परिस्थितीत आपल्या आहारातील खनिजे आणि जीवनसत्त्वे वाढवावी, ज्यामुळे आपले डोळे मजबूत होतात.

Poor Eyesight : अंधूक दिसतंय? मग शरीरात आहे या व्हिटॅमिन्सची कमतरता, कसा असावा आहार? वाचा टीप्स...
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

Poor Eyesight : तुम्हाला अंधूक दिसण्याची समस्या जाणवत असेल किंवा एखादी गोष्ट दिसण्यास त्रास (Weak and poor eyesight) होत आहे का? याचाच अर्थ तुमच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता आहे. जेव्हा आपला आहार चौरस, पौष्टिक आणि पुरेसा नसतो तेव्हाच आपल्या शरीराशी संबंधित समस्या सुरू होतात. आजकाल कमकुवत दृष्टीची समस्या झपाट्याने वाढत आहे. लहान वयातच लोक कमकुवत दृष्टीमुळे, अंधूक दिसण्यामुळे त्रस्त होतात. खाण्यापिण्याच्या अयोग्य (Food habits) सवयी वेळीच सुधारून, चौरस आहार घेतल्यास शरीर मजबूत आणि निरोगी राहते. आहारात मिनरल्स, व्हिटॅमिन यांचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे आपली दृष्टी (Eyesight) सुधारते आणि ती मजबूत होते. चांगली दृष्टी हवी असेल या व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करावा. त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.

असा असावा आहार –

  • व्हिटॅमिन ए (Vitamin A) हे आपल्या डोळ्यांच्या बाहेरील थराचे संरक्षण करण्याचे कार्य करते. व्हिटॅमिन ए मिळावे यासाठी रताळं, गाजर, हिरव्या पालेभाज्या, भोपळा तसेच काळी मिरी यांचा आहारात समावेश करवा.
  • व्हिटॅमिन बी 6, बी 9 आणि बी 12 (Vitamin B6, B9 & B12) हे डोळे व दृष्टी मजबूत ठेवण्याचे काम करतात. यासाठी रोजच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्यास त्यामधून ही व्हिटॅमिन्स सहज मिळतील. तसेच हिरव्या पालेभाज्या, नट्स, सुका मेवा, मांस, डाळी, बीन्स यांचेही नियमितपणे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी व डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.
  • व्हिटॅमिन सी (Vitamin C) हे डोळ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. त्यामध्ये कोलेजन असते जे डोळे आणि आपली त्वचा या दोन्हींसाठी लाभदायक असते. आवळा, लिंबू, पेरू, काळी मिरी, ब्रोकोली या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यांचे नियमितपणे सेवन केल्यास दृष्टी सुधारते.
  • व्हिटॅमिन ई (Vitamin E) हे अँटी-ऑक्सिडेंट्सच्या स्वरूपात काम करते. या व्हिटॅमिनमुळे फ्री रॅडिकल्स आणि हानिकारक तत्वांपासून शरीराचा बचाव होता. सॅल्मन मासा, अॅवोकॅडो, नट्स आणि हिरव्या पालेभाज्या यांच्यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे, चांगली दृष्टी हवी असेल तर या पदार्थांचा नियमितपणे आहारात समावेश करावा.
  • हे सुद्धा वाचा