एनर्जी बूस्टर: प्रतिकारशक्ती ते ऊर्जा निर्मिती; जाणून घ्या- लाल केळीचे फायदे

| Updated on: Dec 15, 2021 | 7:00 AM

लाल केळीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतूमय पदार्थ आणि कार्बोहायड्रेट सामावलेले असते तसेच जीवनसत्वे देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. केवळ ऑस्ट्रिलायतच नव्हे अन्य देशांतही लाल केळींची लागवड केली जाते.

एनर्जी बूस्टर: प्रतिकारशक्ती ते ऊर्जा निर्मिती; जाणून घ्या- लाल केळीचे फायदे
केळी
Follow us on

मुंबई- पोषक आहार निरोगी जीवनशैलीसाठी हितकारक ठरतो. निरामय आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश महत्वाचा मानण्यात येतो. ज्यामध्ये केळी सेवनाचा देखील समावेश होतो. जगामध्ये केळीचे 18 प्रकार दिसून येतात. भारतात प्रामुख्याने पिवळा आणि हिरवी केळी सार्वत्रिकपणे आढळून येते. आज आपण पिवळा किंवा हिरव्या नव्हे तर लाल केळीविषयी माहिती जाणून घेणार आहोत

लाल केळीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतूमय पदार्थ आणि कार्बोहायड्रेट सामावलेले असते तसेच जीवनसत्वे देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. केवळ ऑस्ट्रिलायतच नव्हे अन्य देशांतही लाल केळींची लागवड केली जाते.

प्रतिकारशक्ती

कोविड संसर्गाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी एकाधिक पर्याय अजमाविले जात आहे. तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्यास लाल केळीचा आहारात समावेश नक्की करा. प्रतिकारशक्तीला बळकटी देणारे बी6 आणि व्हिटॅमिन सी जीवनसत्व लाल केळीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

उर्जेचा निर्मिती स्त्रोत

नियमितपणे सकाळच्या नाश्त्यात लाल केळीचा समावेशक आरोग्यासाठी हितकारक ठरतो. तुम्ही सदैव आरोग्यदायी राहतात. त्यामुळे संपूर्ण दिवसभरासाठीची ऊर्जा तुम्हाला याद्वारे प्राप्त होते.

वजनात घट

स्थूलतेचा मोठा परिणाम प्रतिकारशक्तीवर जाणवतो. लाल केळीच्या सेवनाने वजनात घट होते. तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. लाल केळीच्या खाण्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. शरीराला आवश्यक उर्जेचा पुरवठा लाल केळीच्या माध्यमातून सुयोग्य प्रमाणात केला जातो.

डोळ्यांसाठी हितकारक

निरोगी डोळ्यांसाठी लाल केळी अत्यंत हितकारक ठरते. निरोगी डोळ्यांसाठी ल्यूटिन व बीटा कॅरोटिनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. लाल केळ्यामध्ये दोन्ही पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे आजपासूनच तुमच्या आहारात लाल केळीचा समावेश निश्चितच करा.

लाल केळीचा ज्यूस

लाल केळीचा ज्यूस बनविण्यासाठी दूध, इलायची आणि जायफळाचा वापर करा. लाल केळीच्या ज्यूसचा नियमित नव्हे तर आठवड्यातून तीन वेळा तरी सेवन करायलाच हवे. तुमच्या प्रतिकारशक्तीला मोठी बळकटी प्राप्त होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!