होम आयसोलेशनमध्ये कोण राहू शकतो?, आयसोलेशन कधी संपणार; वाचा नवीन गाईडलाईन

| Updated on: May 10, 2021 | 11:02 AM

कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर असून त्यामुळे रुग्ण संख्याही वाढली आहे. (Revised guidelines for Home Isolation of mild /asymptomatic covid cases)

होम आयसोलेशनमध्ये कोण राहू शकतो?, आयसोलेशन कधी संपणार; वाचा नवीन गाईडलाईन
Home Isolation
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर असून त्यामुळे रुग्ण संख्याही वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने होम आयसोलेशनची नवी गाईडलाईन जारी केली आहे. त्यात होम आयसोलेशन कोण राहू शकतो, कधी होम आयसोलेशन व्हायचं असतं आणि कधी त्यातून मुक्ती मिळते, याची संपूर्ण माहिती त्यात देण्यात आली आहे. (Revised guidelines for Home Isolation of mild /asymptomatic covid cases)

होम आयसोलेशन कोण होऊ शकतो?

कोरोना लक्षणे वाटल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. तुम्हाला सौम्य लक्षणे आहेत की लक्षणे रहीत कोरोना आहे हे डॉक्टर तुम्हाला सांगतील. संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला नियमानुसार 14 दिवस क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. रुग्णाच्या देखरेखीसाठी एक व्यक्ती दिवसभर ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहाणं बंधनकारक आहे. 60 वर्षांवरील व्यक्तींना बीपी, हृदयरोग, मधुमेह, किडनीसह अन्य आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. प्रत्येक संक्रमित व्यक्तीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एचसीक्यू ही गोळी घ्यावी लागेल.

होम आयसोलेशनमधील उपचार

संक्रमित व्यक्तीने सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहावं. काही त्रास झाल्यास डॉक्टरांना सांगायला हवा.
इतर काही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या आजाराचेही औषधे सुरू ठेवा. आपल्या मनाने औषध बंद करू नका.
बाधित व्यक्तीला खोकला, नाक वाहणे आणि अन्य काही त्रास असेल तर या लक्षणांना नियंत्रित करण्यासाठी त्यावरील औषधे नियमित घ्या.
रुग्ण व्यक्तीने दिवसातून किमान दोन वेळा गुळणी करावी आणि गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे श्वास नलिका साफ होतात.

औषधांनी ताप जात नसेल तर

650 एमजी पॅरासिटेमॉल दिवसातून चार वेळा घेऊनही ताप जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्टेरॉयडचा वापर करा. कोरोना प्रोटोकॉलनुसार आयव्हरमेक्टिन औषध घ्यायला सुरुवात करा. ताप आणि खोकला पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस असेल तर इन्हेलेशनमधून दिले जाणारे औषध घ्या.

रेमडेसिवीरचा वापर नकोच

नव्या गाईडलाईनमध्ये सरकारने पुन्हा एकदा होम आयसोलेशनमध्ये असाल तर रेमडेसिवीरचा वापर करू नका म्हणून सांगितलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीतच हे औषध घ्यायचं आहे. तोडांने खाण्याचा स्टेरॉईड सौम्य लक्षणे असताना घ्यायचा नाही. सात दिवसानंतरही ताप आणि खोकल्याचे लक्षणे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्टेरॉईडचे नॉर्मल डोस घेऊ शकता.

दहा दिवसानंतर…

नव्या गाईडलाईननुसार लक्षणे जाणवल्याच्या दहा दिवसानंतर रुग्णाला बरे वाटत असेल तर त्याचं होम आयसोलेशन बंद होऊ शकतं. लक्षणे नसलेले रुग्ण सँपल दिल्यानंतर दहा दिवसांनी आयसोलेशन संपवू शकतात. पंरतु, त्यानंतर तीन दिवस ताप असता कामा नये हे लक्षात ठेवा. आयसोलेशन पूर्ण झाल्यावर तपासणी करण्याची गरज नाही. (Revised guidelines for Home Isolation of mild /asymptomatic covid cases)

 

संबंधित बातम्या:

Corona Cases in India | कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, 24 तासातील कोरोनाबळीतही घट

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास डार्क चॉकलेट खा; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचा सल्ला

साताऱ्यातील 13 कोरोनाबळी गेलेल्या हॉटस्पॉटमध्ये लग्नानंतर डीजे पार्टी, व्हिडीओ पाहून पोलिसांची कारवाई

(Revised guidelines for Home Isolation of mild /asymptomatic covid cases)