कधीच पोटावर झोपण्याची करू नका चूक, अन्यथा…. पुरूष आणि महिलांमध्ये यांना सर्वात जास्त धोका!

| Updated on: May 24, 2023 | 11:35 PM

तुम्हाला माहितीये का की, पोटावर झोपल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. या समस्यांबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

कधीच पोटावर झोपण्याची करू नका चूक, अन्यथा.... पुरूष आणि महिलांमध्ये यांना सर्वात जास्त धोका!
Follow us on

Health News : भरपूर लोकं झोपताना नीट झोपत नाहीत, झोपतानाही प्रत्येकाला वेगवेगळ्या सवयी असतात. मग फक्त एका अंगाला झोपणं असो किंवा पूर्णवेळ पालथं म्हणजेच पोटावर झोपणं असो. भरपूर लोकं पोटावर झोपत असतात. पण तुम्हाला माहितीये का की, पोटावर झोपल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. या समस्यांबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

जे लोक नेहमी पोटावर झोपतात त्यांना सतत पोटदुखी, अपचन, कफ होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या का होतात? कारण आपण पालथं झोपल्याने आपल्या पोटावर दबाव पडतो त्यामुळे अन्न पचन नीट होत नाही. मग अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

जे लोक जास्त वेळ पोटाच्या बाजूने झोपतात त्यांना कंबरदुखी सारखं दुखणं ही होऊ शकतं. कारण पोटावर झोपल्याने बॅकबोन जास्त नॅचरल शेपमध्ये राहत नाही, त्याच्यामुळे कंबर दुखीचा त्रास होतो.

डोकं जड सुद्धा होतं. कारण जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठतात त्यावेळी तुमचं डोकं जड झालेले असतं ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो.

पोटावर झोपल्यामुळे भरपूर लोकांना शरीरात वात येण्याची समस्या निर्माण होते. वात आल्यानंतर शरीरातील एखादा अवयव जोरात दुखायला लागतो. लोकांना ही समस्या नेहमी होताना दिसते, त्यामुळे पोटावर झोपू नये.

Disclaimer : दिलेली सर्व माहिती सर्वसामान्या आधारित असून याचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.