डोकेदुखीपासून ते दम्यापर्यंत… शांततेचं प्रतिक असलेल्या कबुतरांमुळे कोणते कोणते आजार होतात? तिसरी बिमारी तर सर्वात…

दादर मधील कबुतरखाना बंद करण्यात आलाय. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे आजार लक्षात घेत पालिकेने मोठा निर्णय घेतला. तर जाणून घेऊ कबुतरांमुळे कोणते - कोणते आजार होतात...

डोकेदुखीपासून ते दम्यापर्यंत... शांततेचं प्रतिक असलेल्या कबुतरांमुळे कोणते कोणते आजार होतात? तिसरी बिमारी तर सर्वात...
| Updated on: Aug 13, 2025 | 2:58 PM

मुंबई महानगरपालिकेकडून दादर मधील कबुतरखाना बंद करण्यात आलाय. मुंबई महापालिकेनं दादर मधील कबुतरखाना ताडपत्रीने झाकून टाकलाय. कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आता कबुतरखाना परिसरात अनेक अंदोलनं देखील होत आहे. सांगायचं झालं तर, शांततेचं प्रतिक असलेल्या कबुतरांमुळे वाद निर्माण झाले आहे. तर कबुतरांमुळे अनेक आजार देखील होतात… ज्यामुळे खबरदारी बाळगणं देखील महत्त्वाचं आहे.

कबुतराच्या विष्ठेत आढळणारे रसायने आणि जंतू मानवांसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. म्हणून, त्यांच्या संपर्कात येणं टाळणं महत्वाचं आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे तुमचं नुकसान कसं होऊ शकतं हे जाणून घेऊ.

हिस्टोप्लाज्मोसिस- हा कबुतराच्या विष्ठेत आढळणाऱ्या हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलॅटम नावाच्या बुरशीमुळे होणारा बुरशीजन्य संसर्ग आहे. या संसर्गामुळे फुफ्फुसांना जळजळ होऊ शकते, ज्यामुळे खोकला, ताप आणि छातीत दुखणं अशी लक्षणं दिसू शकतात.

क्रिप्टोकोक्कोसिस – हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे जो क्रिप्टोकोकस निओफॉर्मिस नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी कबुतरांच्या विष्ठेत आढळते आणि श्वास घेताना शरीरात प्रवेश करू शकते. या संसर्गामुळे फुफ्फुसांना जळजळ आणि मेंदूला संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या सुरुवातीच्या समस्या उद्भवू शकतात.
साल्मोनेला- कबुतरांच्या विष्ठेत साल्मोनेला बॅक्टेरिया आढळतात आणि ते अन्नपदार्थ दूषित करू शकतात. साल्मोनेला संसर्गामुळे अतिसार, ताप, उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते.

ई. कोलाई – कबुतरांच्या विष्ठेतही ई. कोलाय बॅक्टेरिया आढळतात आणि ते अन्न दूषित करतात. ई. कोलाय संसर्गामुळे अतिसार, ताप, उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते.
ॲलर्जी- कबुतराच्या विष्ठेमुळे शिंका येणे, डोळ्यांत जळजळ होणे आणि नाकातून पाणी येणे यासारख्या ॲलर्जीक प्रतिक्रिया देखील होऊ शकतात.

ॲलर्जी- कबुतराच्या विष्ठेमुळे शिंका येणे, डोळ्यांत जळजळ होणे आणि नाकातून पाणी येणे यासारख्या ॲलर्जीक प्रतिक्रिया देखील होऊ शकतात.

साल्मोनेला- कबुतरांच्या विष्ठेत साल्मोनेला बॅक्टेरिया आढळतात आणि ते अन्नपदार्थ दूषित करू शकतात. साल्मोनेला संसर्गामुळे अतिसार, ताप, उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते.