कोरोनामध्ये घ्या या तीन हेल्थ पॉलिसी, कमी प्रिमियमसह मिळेल सुरक्षेची हमी

नवीन नियमानुसार आता कोणत्याही आरोग्य विम्यात कोरोना उपचारांचा समावेश असेल. जर एखाद्याने आधीच एखादी विमा पॉलिसी घेतली असेल तर त्याला कोरोनावर उपचारांची सुविधा मिळेल. (Take these three health policies in Corona, you will get security guarantee with low premium)

कोरोनामध्ये घ्या या तीन हेल्थ पॉलिसी, कमी प्रिमियमसह मिळेल सुरक्षेची हमी
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 3:01 PM

नवी दिल्ली : सध्या कोरोना महामारीने हाहाःकार माजवला आहे. कोरोना संक्रमणामुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. लोकांकडे पैसे आहे पण रुग्णालयात बेड नाही आणि सर्व सोयीसुविधा असूनही रुग्णांचे प्राण वाचवता येत नाही. हा रोग इतका भयावह आहे की यावर कोणत्याही उपचाराचा परिणाम होत नाही. या रोगाने वैद्यकीय जगात एक नवीन ट्रेंड सेट केला आहे. या रोगाने व्हॅक्सिनपासून ऑक्सिजन प्लांट, मास्कपासून सॅनिटायझर किती महत्व कळले आहे. कोविडने आरोग्य विमा कंपन्यांनाही विचार करण्यास भाग पाडले आणि बर्‍याच नवीन पॉलिसी बनविण्याचा मार्ग दाखवला. (Take these three health policies in Corona, you will get security guarantee with low premium)

कोविड हा एक असा आजार आहे ज्यामध्ये साधारण उपचार कार्य करत नाहीत. त्यामध्ये केवळ प्राणवायू, रेमडेसिविर, सीटी स्कॅन आणि आयसीयूद्वारे रुग्णाचे आयुष्य वाचलण्यात येत आहेत. याचा खर्च इतका महाग आहे की सामान्य माणूस मोठ्या रुग्णालयांचा विचारही करु शकत नाही. अशा परिस्थितीत काहीतरी व्यवस्था करावी लागेल. यासाठी सर्वोत्कृष्ट आरोग्य विमा पॉलिसीचा विचार केला जात आहे. आज बाजारात अशी अनेक आरोग्य विमा पॉलिसी आहेत ज्यामध्ये नाममात्र प्रीमियम देऊन कोरोना विरूद्ध कवच खरेदी करता येते. जर ही पॉलिसी घेतली तर विमा कंपन्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलतात. कोरोनाची भीषणता लक्षात घेता सरकारने विमा पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत.

काय आहे नवीन नियम

नवीन नियमानुसार आता कोणत्याही आरोग्य विम्यात कोरोना उपचारांचा समावेश असेल. जर एखाद्याने आधीच एखादी विमा पॉलिसी घेतली असेल तर त्याला कोरोनावर उपचारांची सुविधा मिळेल. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने मागील वर्षी ही सुविधा सुरू झाली. अशा पॉलिसीला कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा पॉलिसी म्हणतात. या प्रकारच्या धोरणामध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर आजारही कवर होतात. नवीन विमा घेतल्यानंतरही कोरोनावरील उपचार त्यात समाविष्ट होतील. यात अट अशी आहे की रुग्णाला किमान 24 तास रुग्णालयात दाखल केले जाणे आवश्यक आहे. तरच उपचाराचा खर्च दिला जाईल. कंपन्या आता कोरोनासाठीही एक विशेष धोरण ऑफर करीत आहेत.

या तीन विमा पॉलिसी आहेत खास

कोरोना कवच

ही पॉलिसी कोरोनासाठी खास बनवली गेली आहे. ही पॉलिसी 18 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती घेऊ शकते. या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकासह त्याचे संपूर्ण कुटुंबाल संरक्षण कवच मिळते. ही पॉलिसी शॉर्ट टर्म म्हणजे अल्प मुदतीसाठी बनवली आहे. आपण या पॉलिसीचा वापर 3.5 महिन्यांपासून 9.5 महिन्यांपर्यंत करू शकता. ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीचा प्रीमियम 1200 ते 3800 रुपयांपर्यंत आहे. याचा फायदा घेण्यासाठी रुग्णास किमान 24 तास रुग्णालयात दाखल करावे लागेल.

कोरोना रक्षक

कोरोनाविरुद्ध संरक्षणासाठी ही दुसरी पॉलिसी आहे. ही पॉलिसी 18-65 वर्षे वयोगटातील व्यक्ती खरेदी करु शकतात. यामध्ये केवळ पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीलाच सुरक्षा कवर मिळते. यामध्ये कौटुंबिक कवर नाही. या पॉलिसीअंतर्गत कोरोना पीडित व्यक्तीला कंपनीच्या वतीने 50 हजार ते 2.50 लाख रुपये मिळतात. ही रक्कम पॉलिसीधारकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. यानंतर, विमा कंपनी खर्च करत नाही. यातही फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो. या पॉलिसीची मुदत 3.5 महिने ते 9.5 महिने आहे. याचा प्रीमियम 250 ते 2200 रुपयांदरम्यान आहे जे पॉलिसी घेणार्‍या व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते.

आरोग्य संजीवनी

या विमा पॉलिसीअंतर्गत आजार किंवा दुर्घटना कवर दिले जाते. या धोरणात, उपचारापूर्वी आणि नंतरचा खर्च समाविष्ट केला जातो. पॉलिसी घेणारी व्यक्ती जर 45 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकता नाही. या पॉलिसीमध्ये 10 लाखांपर्यंतचे कवर उपलब्ध आहे. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी खर्चही यात उपलब्ध आहेत. या विम्यात कवरचे अनेक प्रकार समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, रूग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा खर्च, मोतीबिंदूचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी आणि दातांच्या उपचारासाठी येणारा खर्चदेखील समाविष्ट आहे.

संक्रमित लोकांसाठी नियम

जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत त्यांच्यासाठी विमा कंपन्यांचे काही नियम आहेत. कोरोना संक्रमित व्यक्तीच्या काही अवयवांमध्ये समस्या येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंडात नंतर समस्या येऊ शकतात, म्हणून या लोकांना जास्त प्रीमियम भरावा लागतो. अशा लोकांसाठी कंपन्यांनी 1 ते 6 महिन्यांचा कूलिंग कालावधी निश्चित केला आहे. म्हणजेच, या कालावधीनंतरच कोरोनामधून बरे होणारे लोक आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकतात. (Take these three health policies in Corona, you will get security guarantee with low premium)

इतर बातम्या

शिवसेनेसारखं इतर पक्षांना जमलं नाही, त्यामुळेच अनेक राज्यात आज चिता पेटलेल्या : संजय राऊत

IPL चा सर्व पैसा खर्च करण्याची तयारी, तरीही पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.