AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | ‘हे’ आरोग्यदायी पेय वजन कमी करण्यास मदत करतात, आजच आहारात समावेश करा!

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. हे चयापचय वाढवण्यास मदत करते. वाढवते, पचनाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होते. यासाठी एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या. हे पाणी मंद गॅसवर उकळून एका ग्लासमध्ये टाका. त्यात चिमूटभर काळे मीठ टाकून सेवन करा.

Weight Loss | 'हे' आरोग्यदायी पेय वजन कमी करण्यास मदत करतात, आजच आहारात समावेश करा!
Image Credit source: express.co.uk
| Updated on: Jun 16, 2022 | 11:41 AM
Share

मुंबई : वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली (Lifestyle) असणे आवश्यक आहे. बहुतेक लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. जलद वजन कमी करण्यासाठी आपण आहारात अनेक प्रकारचे आरोग्यदायी पेय (Healthy drinks) देखील समाविष्ट करू शकता. या पेयांमध्ये अनेक प्रकारची मसाले आणि औषधी वनस्पती टाकल्याने ते अधिक निरोगी होते. औषधी वनस्पती शरीरातील विषारी पदार्थ (Food) काढून टाकण्यास मदत करतात. मसाले चयापचय गती वाढवतात, त्यामुळे वजन फास्ट कमी करण्यात मदत होते. चला जाणून घेऊयात या हेल्दी पेयांबद्दल सविस्तरपणे.

जिऱ्याचे पाणी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. हे चयापचय वाढवण्यास मदत करते. वाढवते, पचनाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होते. यासाठी एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या. हे पाणी मंद गॅसवर उकळून एका ग्लासमध्ये टाका. त्यात चिमूटभर काळे मीठ टाकून सेवन करा. यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. शिवाय जिरे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात.

ओव्याचे पाणी

ओव्याचे पाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पाणी पचनसंस्था निरोगी ठेवते, चयापचय गतिमान करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. घरी हे खास पाणी तयार करण्यासाठी ओवा रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये टाकून चांगले उकळून घ्या. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण या पाण्यामध्ये लिंबू देखील मिक्स करू शकता. कोमट असताना या पाण्याचे लगेचच सेवन करा.

हळद

हळदीच्या पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच हळद आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या दूर करते. हळदीचे पेय बनवण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाका. हे पाणी उकळा आणि पाणी थोडे थंड झाले की सेवन करा. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात थोडासा मध देखील मिक्स करू शकता. हळदीच्या पाण्याने आपले वजन फास्ट कमी होते. हळदीमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!