ही लक्षणे दिसत असतील तर समजा तुम्हाला अधिक झोपेची आहे गरज, करू नका दुर्लक्ष

| Updated on: Oct 25, 2022 | 4:47 PM

तुम्हाला दिवसभरात वारंवार कॅफेनची आवश्यकता वाटत असेल तर ते झोप पूर्ण न झाल्याचे लक्षण असते.

ही लक्षणे दिसत असतील तर समजा तुम्हाला अधिक झोपेची आहे गरज, करू नका दुर्लक्ष
Follow us on

नवी दिल्ली – झोप आणि आरोग्य (sleep and health) यांचा परस्परसंबंध आहे. सुंदर त्वचा, पचन, मानसिक आरोग्य, रक्तदाब हे सर्व चांगले रहावे यासाठी पुरेशी व गाढ झोपं घेणं गरजेचं आहे. पण सध्याच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे (bad lifestyle) लोकांच्या झोपेवर खूप परिणाम होत आहे. रात्री गाढ झोप न मिळाल्याने शारीरिक व मानसिक आरोग्यही बिघडते. स्लीप एज्युकेशनच्या मते, दिवसभर चांगले काम करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सुमारे 7 ते 8 तासांची झोप मिळणे हे खूप महत्वाचे असते. तसे न झाल्यास आपले आरोग्य (health) आणि आपली कार्यक्षमता या दोन्हींवर विपरीत परिणाम होतो.

तुम्हाला अधिक झोप घेणे गरजेचे आहे, हे शरीरातील काही लक्षणांवरून दिसून येते. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

घड्याळाचा गजर झाल्याशिवाय उठता न येणे –
जेव्हा तुम्ही चांगली झोप घेता, तेव्हा जाग येण्यासाठी तुम्हाला घड्याळाच्या गजराची गरज नसते. झोप पूर्ण झाल्यावर तुम्हाला स्वत:हून जाग येते. पण जर तुम्हाला घड्याळाचा गजर वाजल्यानंतरही झोप येत असेल किंवा आळस वाटत असेल, तर तुम्हाला अधिक झोपेची गरज आहे.

हे सुद्धा वाचा

वाहन चालवण्यात येणारी अडचण –
जर तुम्हाला गाडी चालवतानाही झोप येत असेल, तर हे तुम्हाला अधिक झोप गरजेची असल्याचे लक्षण आहे. हे चिन्ह धोकादायकही ठरू शकतं. कारण बऱ्याच वेळेस झोपेच्या अभावामुळे अपघात होतात, असे म्हटले जाते.

अधिक प्रमाणात चहा-कॉफी पिणे –
तुम्ही दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने करत असला तर ठीक आहे. पण तुम्हाला दिवसभरात वारंवार चहा-कॉफी पिऊन कॅफेनची आवश्यकता वाटत असेल तर ते रात्री झोप नीट पूर्ण न झाल्याचे लक्षण असते. त्यामुळे तुम्हाला अधिक झोप मिळणे गरजेचे आहे.

लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणे –
जर तुम्ही कामाच्या ठिकाणी वारंवार चुका करत असाल किंवा तुम्हाला कामावर नीट लक्ष केंद्रित करता येत नसेल तर हेही कमी झोप मिळत असल्याचे लक्षण असते.

विसरणे –
तुम्ही वारंवार गोष्टी विसरत असाल किंवा छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्यास तुम्हाला अडचण येत असेल तर तुमची झोप नीट पूर्ण होत नाही हे समजावे. तुम्हाला पुरेशा व गाढ झोपेची आवश्यकता आहे.