कधी पाऊस तर कधी कडकडीत ऊन, बदलत्या हवामानात मुलांना सर्दी खोकला झाल्यास हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

बदलता हवामानांमध्ये मुलांना सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता जास्त असते. तर यासाठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.

कधी पाऊस तर कधी कडकडीत ऊन, बदलत्या हवामानात मुलांना सर्दी खोकला झाल्यास हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Sardi Khokala
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Apr 09, 2026 | 10:31 PM

महाराष्ट्रसह देशातील बहुतेक भागांमध्ये रखरखीत उन्ह तर कधी मुसळधार पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत या बदलत्या वातावरणांमुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे व घरात लहान मुलं आहेत त्यांना सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता जास्त असते. कारण बदलत्या हवामानात सर्दी आणि खोकला होणे एक सामान्य समस्या आहे आणि ही अनेकांना होत असते. हवामानातील बदलामुळे शरीराच्या तापमानावर परिणाम होतो, ज्यामुळे खोकला आणि सर्दी होते. अशा परिस्थितीत या बदलत्या वातावरणामुळे सर्दी आणि खोकल्याची समस्या सर्वात आधी लहान वयातील मुलांना होते. बदलत्या हवामानात मुलांना सर्दीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते घरगुती नैसर्गिक उपाय करायचे हे जाणून घेऊयात.

हवामान बदलताना मुलांना आणि काही लोकांना सर्दी का होते?

तज्ञांच्या मते हवामान बदलल्यावर तापमानही बदलते. अशा परिस्थितीत आपल्या शरीराचे तापमान सभोवतालच्या वातावरणाशी जुळत नाही आणि या चढ-उतारांचा परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर होतो. मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यामुळे त्यांना सहज सर्दी होते.

खोकला आणि सर्दीवरील घरगुती उपाय

घरगुती उपायांचा अवलंब : तुमच्या मुलांची प्रतिकारशक्ती कमी असेल आणि त्याला सहज सर्दी-खोकला होत असेल, तर गरम पाण्याची वाफ घेण्याचा उपाय करून पहा. ही पद्धत केवळ छाती स्वच्छ करत नाही, तर प्रतिकारशक्ती देखील वाढवते. एका पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यात तुळस, दालचिनी आणि लवंग यांसारखे घटक मिक्स करा. त्यांच्या नैसर्गिक सुगंधामुळे छाती स्वच्छ होते आणि सर्दीपासून आराम मिळतो. हा एक प्रकारचा संसर्ग आहे, जो तुळशीसारख्या नैसर्गिक घटकांनी प्रभावीपणे कमी केला जाऊ शकतो.

आयुर्वेदिक पोटली : लहान मुलं असो वा मोठी व्यक्ती सर्दी झाल्यावर प्रत्येकाने आयुर्वेदिक उपाय करून पाहावेत. मूल लहान असल्यास आयुर्वेदिक पोटली तयार करून ते झोपलेले असताना त्याच्याजवळ ठेवा. यासाठी दालचिनी, लवंग, ओवा आणि जायफळ यांसारखे मसाले तव्यावर भाजून घ्या. भाजल्यानंतर त्यात कापराचे तुकडे टाका आणि ते एका सुती कापडात घट्ट बांधा. ही पोटली मुलाजवळ ठेवा. त्याच्या सुगंधाने सर्दीपासून आराम मिळतो.

पान-ओव्याचा उपाय : तुम्ही तुमच्या मुलांना सर्दी खोकला झाल्यास विड्याची पानं आणि ओवा घातलेले पाणी पिण्यास देऊ शकता. यासाठी एका भांड्यात पानी घेऊन त्यात दोन ते तीन विड्याची पाने ठेवा आणि एक चमचा ओवा मिक्स करा, आता हे पाणी उकळल्यानंतर थंड होऊ द्या आणि तुमच्या मुलाला थोड्या थोड्या प्रमाणात हे पाणी प्यायला द्या. यामुळे केवळ मुलाची छाती साफ होणार नाही, तर पचनक्रिया देखील सुधारेल. पोटाचे विकार असलेल्या मुलांना हे पाणी वारंवार दिले पाहिजे.

आले, काळी मिरी आणि मध : सर्दी आणि खोकल्यावर हा एक उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे. आल्याचे काही तुकडे घ्या ते बारीक किसून त्याचा रस काढा. त्यात थोडी काळी मिरी आणि एक चमचा मध मिक्स करा. या उपायामुळे तुमच्या मुलाची प्रतिकारशक्ती वाढेल, कारण आले आणि काळ्या मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. काळी मिरी व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत आहे, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि मजबूत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us