Ageing Foods : हे पदार्थ खाणं आजचं थांबवा, अन्यथा वेळेआधीच दिसू लागाल म्हातारे..

शरीर निरोगी रहावे आणि त्वचाही तरूण दिसावी यासाठी हेल्दी आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे असते. मात्र काही पदार्थ असे असतात जे आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकतात

Ageing Foods : हे पदार्थ खाणं आजचं थांबवा, अन्यथा वेळेआधीच दिसू लागाल म्हातारे..
| Updated on: Aug 19, 2023 | 4:56 PM

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : पोषक तत्वं (nutritions) ही आपल्या जीवनासाठी, चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असतात. त्यावरच आपले संपूर्ण आरोग्य अवलंबून असते. आपण काय खातो-पितो याचा आपल्या त्वचेच्या संरचेनवरही प्रभाव पडतो.ऑक्सिडेटिव्ह तणाव, जळजळ आणि एकंदर आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे काही खाद्यपदार्थांमुळे अकाली वृद्धत्व (ageing before time) येऊ शकते. त्याची इतरही कारणेही असू शकतात, पण अन्नाचाही त्यात समावेश असतो. असे पदार्थ कोणते ते जाणून घेऊया.

साखर : साखरेचे खूप जास्त सेवन केले तर हानिकारक कंपांऊडची निर्मिती होऊ शकते. जे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस आणि टिश्यू डॅमेजसाठी कारणीभूत ठरतात.

पनीर : यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि सोडियम असू शकते, जे जळजळ व हृदयाशी संबंधित समस्यांशी जोडलेले असते. याशिवाय, यामुळे वृद्धत्वाची समस्या देखील वाढू शकते.

कोल्ड ड्रिंक : स्वीट सोडा आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले एनर्जी ड्रिंक्समुळे वजन वाढू शकते आणि ग्लायकेशन होऊ शकते, जे वृद्धत्वाशी संबंधित प्रभावांना प्रोत्साहन देते.

सॉस : अनहेल्दी फॅट, साखर असलेले काही सॉस हे ऑक्सीडेटिव्ह तणाव वाढवतात, ज्यामुळे वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

बेक्ड पदार्थ : मैदा, साखर व अनहेल्दी फॅट्स असलेले बेक्ड पदार्थ खाल्ल्याने जळजळ वाढते तसेच वजनही वाढू शकते. यामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या आणि आरोग्याच्या एकंदर समस्या वाढू शकतात.

चांगल्या आरोग्यासाठी आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करण्यासाठी निरोगी आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)