Period Pain Relief: मासिक पाळीच्या दुखण्याने त्रस्त असाल तर ‘या’ घरगुती उपायांचा वापर करून पहा

दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रास सहन करावे लागतात, अशा वेळी वेदना होत असतील तर गरम पाण्याने शेकावे.

Period Pain Relief: मासिक पाळीच्या दुखण्याने त्रस्त असाल तर या घरगुती उपायांचा वापर करून पहा
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 21, 2023 | 3:28 PM

नवी दिल्ली – महिलांना दर महिन्याला मासिक पाळीदरम्यान (period pain) काही त्रास होतो. काहींची पाठ दुखते तर काहींचे पोट(stomach pain) , पण या वेदना असह्य असतात. आकड्यांनुसार अर्ध्याहून अधिक महिलांना हा त्रास सहन करावा लागतो. काही महिलांना हा त्रास सहन करता येतो, पण काहींना त्याचा खूपच (health) त्रास होतो. पण बहुतांश महिलांच्या बाबतीत पीरिएड पेनमुळे संपूर्ण दिवस प्रभावित होतो.

पीरिएड्स दरम्यान हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो. यासोबतच प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी झाल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होतो. 40 टक्के महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदनांसोबत काही लक्षणेही शरीरात दिसतात. या लक्षणांमध्ये ओटीपोटात सूज येणे आणि वेदना, स्तन कोमल होणे, पोट फुगणे, एकाग्रता कमी होणे, मूड बदलणे, जडपणा आणि थकवा जाणवणे यांचा समावेश होतो.

पीरिएड्सच्या काळात या वेदना कमी करण्यासाठी महिला अनेकदा पेन किलरची मदत घेतात, ज्याचे काहीवेळा दुष्परिणाम होतात. दर महिन्याला येणार्‍या मासिक पाळीमुळे तुम्हालाही त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करा. घरगुती उपायांनी मासिक पाळीच्या वेदनांमध्ये सहजपणे आराम मिळतो आणि शरीरावर त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. हे कोणते उपाय आहेत, ते जाणून घेऊया.

गरम पाण्याने शेका

जर तुम्हाला ओटीपोटात दुखणे आणि क्रॅम्प्स (क्रॅम्पड स्नायू) यांचा त्रास होत असेल, तर तुमचे पोट कोमट पाण्याने शेकावे. ओटीपोटावर गरम पाण्याची पिशवी, हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याची बाटली ठेवल्याने क्रॅम्पपासून मुक्त होण्यास मदत होते.

सोपे व्यायाम करा

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी काही व्यायाम खूप प्रभावी ठरतात. पेटके दूर करण्यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग किंवा स्ट्रेचिंग सारखे व्यायाम करू शकता. व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंचे क्रॅम्प्स दूर होतात. व्यायामामुळे तुमच्या शरीरातून एंडोर्फिन सोडले जाते, जे मूड सुधारते आणि क्रॅम्प्स कमी करते.

जास्तीत जास्त पाणी प्या

आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज किमान एक ते दोन लिटर पाण्याची आवश्यकता आहे. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

हर्बल चहा प्या

लव्हेंडर आणि पेपरमिंट सारख्या हर्बल चहाचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो.