“खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो”, केंद्राने नियमावली बदलली, वाचा नवे नियम

| Updated on: May 27, 2021 | 3:53 AM

कोरोना विषाणू बाधित व्यक्ती खोकल्यानं, शिंकल्यानं किंवा बोलल्यानं ड्रॉपलेटच्या मदतीने हवेत पसरतो. तेथूनच या संसर्गाला सुरुवात होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो, केंद्राने नियमावली बदलली, वाचा नवे नियम
सांकेतिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड 19 बाबतच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. कोरोना विषाणू बाधित व्यक्ती खोकल्यानं, शिंकल्यानं किंवा बोलल्यानं ड्रॉपलेटच्या मदतीने हवेत पसरतो. तेथूनच या संसर्गाला सुरुवात होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. आधीच्या संशोधनात जवळच्या व्यक्तीकडूनच संसर्ग होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, नव्यानं पुढे आलेल्या माहितीनुसार बाधित व्यक्तीच्या खोकला, शिंकणे किंवा बोलण्यातून विषाणू ड्रॉपलेटमधून फरशीवर किंवा इतर ठिकाणी काही काळासाठी राहू शकतो. त्यानंतर तेथे कुणाचा हात लागला, स्पर्ष झाला तर हात तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना लागून संसर्ग होतो (Virus spread through air due to coughing sneezing talking Center government change Corona guidelines).

“जमीन किंवा पृष्ठभागाला हात लावल्यानेही कोरोना संसर्ग”

या नव्या संसर्गाला फोमाईट ट्रान्समिशन म्हणून ओळखलं जातं. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोविड 19 साठी राष्ट्रीय क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल तयार केलेत. यातच आता बदल झालेत. यात कोरोना विषाणूचं वहन करणारे ड्रॉपलेट्स जमिनीवर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर असू शकता असं म्हटलंय.

कोरोनाचे विषाणू हवेत 10 मीटरपर्यंत पसरु शकतात, खेळती हवा महत्त्वाची

केंद्र सरकारच्या प्रमुख आरोग्य सल्लागार कार्यालयाकडून एक महत्त्वाची नवी गाईडलाईन जारी करण्यात आलीय. यानुसार, बाधित व्यक्तीच्या शरीरातून निघाणारे ड्रॉपलेट्स म्हणजेच एरोसोलच्या माध्यमातून कोरोनाचे विषाणू हवेत 10 मीटरपर्यंत पसरु शकतात. हेच लक्षात घेऊन तज्ज्ञांनी शारीरिक अंतर, स्वच्छतेसह खेळती हवाही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. खेळती हवा हवेतील कोरोना विषाणूंचा धोका कमी करते असंही सांगण्यात आलंय.

शिंकणे, खोकला किंवा बोलताना नाक-घशातून जे ड्रॉप्लेट्स निघतात त्यातील मोठे थेंब जमिनीच्या पृष्ठभागावर पडतात, तर छोटे हवेत मिसळतात. त्यामुळेच यापासून संरक्षणासाठी मास्क, शारीरिक अंतर, खेळती हवा असे उपाय सुचवण्यात आलेत.

हेही वाचा :

भारतात कोरोना संपण्यासाठी ‘हा’ एकमेव उपाय, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांकडून सुतोवाच

तिसऱ्या लाटेचा विचार करुन ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त बेड, औषधे, रेमिडिसिवीरसह आरोग्य सुविधांवर भर : अजित पवार

COVID Vaccination: कोरोना होऊन गेलाय त्यांनी लस कधी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचं मत काय?

व्हिडीओ पाहा :

Virus spread through air due to coughing sneezing talking Center government change Corona guidelines