COVID Vaccination: कोरोना होऊन गेलाय त्यांनी लस कधी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचं मत काय?

जर कोरोना होऊन त्यातून बरे झाले असाल, तर कोरोना लस कधी घ्यावी असा प्रश्न अनेकांना पडलाय.

COVID Vaccination: कोरोना होऊन गेलाय त्यांनी लस कधी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचं मत काय?
corona vaccination
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 3:34 AM

COVID Vaccination : जर कोरोना होऊन त्यातून बरे झाले असाल, तर कोरोना लस कधी घ्यावी असा प्रश्न अनेकांना पडलाय. याबाबत नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने (NTAGI) महत्त्वाची शिफारस केलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड19 बाधित रुग्णांनी बरे झाल्यानंतर 6 महिन्यांनी कोरोना लस घ्यावी, अशी सूचना या तज्ज्ञांच्या गटाने केलीय. सध्या देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. संसर्गावर नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्‍य सरकार लसीकरणावर लक्ष्य केंद्रीत करत आहे. अनेक राज्यांमध्ये तर लसींचा तुटवडा असल्यानं 18 वर्शांवरील नागरिकांना लसीकरण सुरुच करता आलेलं नाही (NTAGI recommendation on when covid recovered patient should take vaccination Corona Vaccine).

NTAGI मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “NTAGI ने कोविड19 बाधित लोकांना बरे झाल्यावर 6 महिने लस न घेण्याचा सल्ला दिलाय. अशा रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यावर 6 महिन्यांनी लस घेण्याची शिफारस करण्यात आलीय. गर्भवती महिलांना कोणतीही लस घेण्याचा पर्यात द्यायला हवा असंही सुचवण्यात आलंय. स्‍तनपान करणाऱ्या महिलांना प्रसुतीनंतर केव्हाही लस देता येईल, असंही सांगण्यात आलंय.”

कोविशिल्‍डच्या दोन डोसमध्ये किती अंतर असावं?

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्‍युनायजेशनने (NTAGI) कोरोना लसीकरण करताना कोविशिल्‍डच्या दोन डोसमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिलाय. सध्या कोविशिल्‍डच्या दोन डोसमधील अंतर 4 ते 8 आठवड्यांचं आहे. NTAGI ने आपल्या या शिफारसी कोविड19 लसीकरण व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या नॅशनल एक्‍सपर्ट ग्रुपला पाठवल्या आहेत.

मागील 24 तासात 3.62 लाख रुग्ण

मागील 24 तासात देशात कोविड-19 चे नव्याने 3 लाख 62 हजार 727 रुग्ण आढळले आहेत. तसेच 4120 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासोबतच देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून 2 कोटी 37 लाख 03 हजार 665 इतकी झालीय. याशिवाय भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या वाढून आता 2 लाख 58 हजार 317 इतकी झालीय. देशात कोविड-19 चे 37 लाख 10 हजार 525 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.

हेही वाचा :

कोरोनाच्या दोन लसींमध्ये किती अंतर असावं? सरकारी पॅनलची नवी सूचना लस सर्वांपर्यंत पोहोचवणार?

Covaxin | 2 ते 18 वयोगटावर कोवॅक्सिनची चाचणी, DCGI कडून भारत बायोटेकला परवानगी

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक : राजेश टोपे

व्हिडीओ पाहा :

NTAGI recommendation on when covid recovered patient should take vaccination Corona Vaccine

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.