18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक : राजेश टोपे

सध्या महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय.

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक : राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 8:05 PM

मुंबई : “सध्या महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही,” अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय (Maharashtra lockdown extended till 31 may 2021 stay to vaccination of 18 to 44 age group said Rajesh Tope after cabinet meeting).

राजेश टोपे म्हणाले, “तुर्त महाराष्ट्रात 18-44 वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील. 4-5 दिवसानंतर अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाली की पहिल्या डोसचा निर्णय घेवू,”

“45 वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही 45 वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी 20 लाख डोस हवेत. सध्या केवळ 10 लाख आहेत. पहिल्या डोसची लगेच अपेक्षा करू नये,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

लॉकडाऊन वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या 7 लाखांवरून 4 लाख 75 हजारवर आलीय. महाराष्ट्राच्या रुग्णवाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा आहे. त्यामुळे ही संख्या आणखी कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची एकमताने मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. सीरम जेव्हा लस देईल तेव्हा 18 ते 44 गटातील नागरिकांना लस दिली जाईल,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनीच यावे. पहिला डोस लसीकरण केंद्रांवर आता मिळणार नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस कोरोना रोखण्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. राज्यात 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. अशात राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या 16 लाख कोविशिल्ड (Covishield), तर 4 लाख कोव्हॅक्सिन (Covaccin) अशी 20 लाख लस बाकी आहे. 7 लाख कोविशिल्ड, तर 4 लाख कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या बाकी आहे. हे लक्षात घेता सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसऱ्या लस देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा : 

जालन्यात आता लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट; राजेश टोपेंचे आदेश

कोरोनाचा लहान मुलांना विळखा, पुण्यासह ठाणे, नागपुरात चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार

लहान मुलांवर कोरोनाचा हल्ला, खबरदारी म्हणून राज्यात तज्ज्ञांची टास्क फोर्स

व्हिडीओ पाहा :

Maharashtra lockdown extended till 31 may 2021 stay to vaccination of 18 to 44 age group said Rajesh Tope after cabinet meeting

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.