लहान मुलांवर कोरोनाचा हल्ला, खबरदारी म्हणून राज्यात तज्ज्ञांची टास्क फोर्स

कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. (child Corona infection Rajesh Tope)

लहान मुलांवर कोरोनाचा हल्ला, खबरदारी म्हणून राज्यात तज्ज्ञांची टास्क फोर्स
RAJESH TOPE

मुंबई : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे, असी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. (due to increase in Corona infection in child Maharashtra government will form task force of expert announced by Rajesh Tope)

तातडीने टास्क फोर्सची स्थापना केली जाणार

यावेळी पोलताना त्यांनी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केली जाईल,” असे राजेश टोपे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला

तसेच पुढे बोलताना रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील गुरूवारी रात्री विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला, अशी माहिती टोपे यांनी दिली.

लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार

पुढे बोलताना त्यांनी राज्यातील लसीकरण मोहिमेवर प्रकाश टाकला. त्यांनी महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाहीये. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

स्पुटनिक लसीसाठी बोलणी सुरु

राज्यात सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यावर बोलताना टोपे यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला. “महाराष्ट्रात रशीयातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशीयन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे. तसेच, जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहेत. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 लाख रेमडेसीव्हीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : उस्मानाबाद जिल्ह्यात 6 दिवसांचा जनता कर्फ्यु

Maratha Reservation Live | सुप्रीम कोर्टाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री

Mumbai Model | काय आहे ‘मुंबई मॉडेल’, ज्याची सुप्रीम कोर्टानं स्तुती केली, केंद्राला दिल्लीसाठी राबवायला सांगितलं!

(due to increase in Corona infection in child Maharashtra government will form task force of expert announced by Rajesh Tope)

Published On - 7:54 pm, Fri, 7 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI