AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या दोन लसींमध्ये किती अंतर असावं? सरकारी पॅनलची नवी सूचना लस सर्वांपर्यंत पोहोचवणार?

कोरोनाचा दुसरा डोस कधी घ्यावा याबाबत असलेला संभ्रम आज दूर झाला. (corona vaccination procedure and standard method)

कोरोनाच्या दोन लसींमध्ये किती अंतर असावं? सरकारी पॅनलची नवी सूचना लस सर्वांपर्यंत पोहोचवणार?
VACCINATION
| Updated on: May 13, 2021 | 5:16 PM
Share

मुंबई : सध्या कोरोना लस घेण्यासाठी जो तो उत्सुक आहे. ही लस आली तेव्हा कित्येक जण लसीकरण केंद्राकडं फिरकायलाही तयार नव्हते. पण आता पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतायत. लस मिळण्याची खात्री नसतानासुद्धा लोक मे महिन्यातल्या उन्हात थांबण्यासाठी तयार आहेत. (what gap should be in second dose of Covid vaccine here are all details)

काय आहेत NTAGIच्या शिफारशी ?

कोरोनाचा दुसरा डोस कधी घ्यावा याबाबत असलेला संभ्रम आज दूर झाला. लसीकरणासंबंधी केंद्र सरकारनं नेमलेल्या पॅनेलनं सर्वच शंकांना उत्तर मिळतील अशा शिफारसी केल्यात. नॅशनल टेक्निकल अडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन अर्थात NTAGIनं या शिफारशी केल्यात. काय आहेत या शिफारशी वाचा सविस्तरपणे…

1) कोविशील्डची लस घेतलेल्यांनी दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनंतरच घ्यावा म्हणजे तीन ते चार महिन्यांचे अंतर ठेवावे असं या पॅनलनं सुचवलंय. सध्या हे अंतर चार ते आठ आठवडे म्हणजे एक ते दोन महिने इतकं आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं ही कोविशील्ड लस बनवली आहे.

2) जे रुग्ण कोरोनातून बरे झालेयत त्यांनी सहा महिने कोणतीही लस घेऊ नये असं या पॅनेलनं सुचवलंय.

3) गरोदर महिलांनी बाळंतपणानंतर कोविशील्ड किंवा कोवॅक्सिन अशी कोणतीही लस घ्यावी, त्यात काहीही धोका नाही असं या पॅनेलनं म्हंटलंय.

4) स्तनपान करणाऱ्या महिलांनाही लस घ्यायला या पॅनलनं आपल्या शिफारशींत हिरवा कंदील दाखवलाय.

कोवॅक्सिनच्या दोन डोसमधलं अंतर मात्र सध्या जेवढे आहे तेवढंच म्हणजे चार ते आठ आठवडे इतकंच आहे. भारतात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोनच लसी दिल्या जातायत आणि देशभर 18 कोटी लोकांना या लसी देण्यात आल्यात. केंद्र सरकारनंही राज्यांना दिलेल्या सूचनांमध्ये दोन डोसमधले अंतर चार ते सहा आठवडे आणि चार ते आठ आठवडे ठेवा असं सांगितलं होतं. नॅशनल टेक्निकल अडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन अर्थात NTAGIनं या शिफारशी ‘नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन’कडे पाठवल्या आहेत.

द लॅन्सेट जर्नल काय म्हणतंय ?

द लॅन्सेट या जगप्रसिद्ध जर्नलनंही दोन डोसमधल्या अंतराबद्दल भाष्य केलंय. दोन डोसमधलं अंतर सहा आठवड्यांऐवजी 12 आठवडे राहावं म्हणजे लसीचा अधिकाधिक प्रभाव राहण्यासाठी दीड महिन्यांऐवजी तीन महिन्यानंतर दुसरा डोस घ्यावा असं लॅन्सेटनं म्हंटलंय. पहिला डोस घेतल्यानंतरच्या तीन महिन्यांत कोरोनापासून 76 % संरक्षण होते असं लॅन्सेटचं मत आहे. दुसरा डोस तीन महिन्यांनंतर घेतला तर रोगप्रतिकारक शक्तीही पुढे फार काळपर्यंत टिकते असं लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेला अभ्यास सांगतो.

भारतातील लसीकरण मोहिमेचे टप्पे

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाची मोहिम सुरु झाली. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सना लस देणे सुरु झालं. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांसाठी लस उपलब्ध झाली. ज्येष्ठांसोबत को-मॉर्बिड असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस देणे सुरु झाले. 1 मे पासून 45 वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध झाली, पण लसीच्या तुटवड्यामुळं काही ठिकाणीच हे लसीकरण होऊ शकलं. अनेक राज्यांनी तर 45 वर्षांवरील नागरिकांना लस सुरुही केली नाही. महाराष्ट्रात 1 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध झाली, पण लसटंचाईमुळं 14 तारखेपासून ती बंद करण्यात आली. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस प्राधान्यानं देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

लसीचं उत्पादन किती होणाराय ?

सगळा देश लस टंचाईला सामोरा जात असतानाच सिरम आणि भारत बायोटेक कंपन्यांनी पुढल्या 4 महिन्यांचा लस उत्पादनाचा प्लॅन केंद्र सरकारला पाठवलाय. सिरमनं आम्ही ऑगस्टपर्यंत 10 कोटी लसींचे उत्पादन करु असं म्हंटलंय तर भारत बायोटेकनं ऑगस्टपर्यंत 7.5 कोटी डोस बनवू असं म्हंटलंय. म्हणजे पुढल्या चार महिन्यांत भारतात फक्त 17.5 कोटी डोसचं उत्पादन होणार आहे. भारतात आतापर्यंत 13.66 कोटी लोकांना पहिला डोस तर फक्त 3.86 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आलाय.

इतर बातम्या :

लॉकडाऊन वाढल्यामुळे व्यापारी ठाकरे सरकाविरोधात आक्रमक; तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

Maharashtra Coronavirus LIVE Update : शहापूरमध्ये 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन, नागरिकांकडून नियमांची पायमल्ली 

(what gap should be in second dose of Covid vaccine here are all details)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ