AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात कोरोना संपण्यासाठी ‘हा’ एकमेव उपाय, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांकडून सुतोवाच

अमेरिकेचे (US) मुख्य आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची (Anthony Fauci) यांनी भारताला सध्याच्या कोविड-19 च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचा मास्टर प्लॅन सुचवला आहे.

भारतात कोरोना संपण्यासाठी 'हा' एकमेव उपाय, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांकडून सुतोवाच
| Updated on: May 10, 2021 | 4:47 PM
Share

Anthony Fauci on India’s Covid-19 Situation वॉशिंग्टन : अमेरिकेचे (US) मुख्य आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची (Anthony Fauci) यांनी भारताला सध्याच्या कोविड-19 च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचा मास्टर प्लॅन सुचवला आहे. यानुसार त्यांनी नागरिकांचं लसीकरण करणं हाच एकमेव दीर्घकालीन उपाय असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी या घात विषाणूचा सामना करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना लसीचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली (Covid Vaccine). अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार फाऊची यांनी एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलं (Anthony Fauci on suggest important solution to stop corona infection in India Covid-19 Situation).

फाउची म्हणाले, “कोरोनाच्या विषाणूला संपूर्णपणे संपवायचं असेल तर लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय आहे. भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे (Solution of India’s Covid Situation). त्यासाठी भारताला देशातूनच नाही तर देशाबाहेरुनही संसाधनं उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच भारताने एक तर इतर देशांना कोरोना उत्पादनासाठी सहकार्य करावं किंवा थेट लस दान द्यावी. एका वर्षाप्रमाणे चीनने जसे तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालयं बनवली होती तशीच रुग्णालयं भारतानेही उभी करायला हवीत.”

लॉकडाऊनच्या आवश्यकतेवरही भर

“भारताला रुग्णालयं उभी करावीच लागतील. लोकांना रुग्णालयात बेड नाहीत म्हणून गल्लीत मोकळं सोडून देता येणार नाही. ऑक्सिजनची स्थिती फार नाजूक आहे. लोकांना ऑक्सिजन (Oxygen Situation in India) न मिळणं हे फारच दुखद आहे. तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन, पीपीई किट आणि इतर वैद्यकीय साहित्याची अडचण आहे. त्यामुळेच देशपातळीवर कोरोना संसर्ग नियंत्रणात आणायचा असेल तर देशव्यापी लॉकडाऊनची गरज आहे,” असंही फाउची यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

खासगी रुग्णालयात कोरोना लसींच्या दरात 6 पटीने वाढ, तुमच्या शहरात लसीची किंमत किती?

मुंबईत कोरोना रुग्ण डबलिंग रेट वाढला, अंधेरीत 120 दिवसांवर, विभागवार रुग्ण दुपटीचा कालावधी पाहा

कोरोना उपचाराचे पैसे परत मिळणार, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

व्हिडीओ पाहा :

Anthony Fauci on suggest important solution to stop corona infection in India Covid-19 Situation

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.