AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना उपचाराचे पैसे परत मिळणार, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

मुंबई उच्च न्यायालायाच्या औरंगाबाद खंडपीठानं महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. Mahatma Phule Jan Arogya Scheme

कोरोना उपचाराचे पैसे परत मिळणार, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
Bombay High Court
| Updated on: May 10, 2021 | 10:56 AM
Share

सोलापूर: मुंबई उच्च न्यायालायाच्या औरंगाबाद खंडपीठानं महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतील कोरोना उपचाराची बिले परत मिळणार आहेत. कोरोनावरील उपचार घेतलेल्या रुग्णांकडून ज्या खासगी रुग्णालयांनी बिले आकारली ती परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश औरंगाबाद खंडपीठानं दिल्या आहेत. (Bombay High Court Aurangabad Bench order State Government take action to Refund bills to Covid patients who cover in Mahatma Phule Jan Arogya Scheme)

कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांनी रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत करण्याविषयी काय कार्यवाही केली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या शिवाय0 संबंधित रुग्णालयावर काय कारवाई केली, याचा अहवाल ही न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट असणाऱ्या काही रुग्णालयांकडून रुग्णांकडून रक्कम घेतली जात असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी याचिका दाखल केली होती. ओमप्रकाश शेटे यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिला. रुग्णांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश न्यायालयानं दिल्याची माहिती आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत

औरंगाबाद खंडपीठानं महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रुग्णांनी ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतला त्या रुग्णालयाचे बील, मेडिकलच्या पावत्या, रुग्णांचे आधार कार्ड ,रेशन कार्ड, झेरॉक्स प्रत जोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये किती रुपयांचं विमा संरक्षण

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कुणाला?

या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

संबंधित बातम्या:

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किती आणि कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?

 कोरोनाचं संकट वाढतंय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती तुमच्याकडं असणं गरजेचं, वाचा सविस्तर

(Bombay High Court Aurangabad Bench order State Government take action to Refund bills to Covid patients who cover in Mahatma Phule Jan Arogya Scheme)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.