खासगी रुग्णालयात कोरोना लसींच्या दरात 6 पटीने वाढ, तुमच्या शहरात लसीची किंमत किती?

भारतातील कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये लसीची किंमत 700 - 1,500 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे इतर देशांच्या तुलनेत ही किंमत सर्वाधिक आहे. (Private Hospital Corona vaccination Price) 

खासगी रुग्णालयात कोरोना लसींच्या दरात 6 पटीने वाढ, तुमच्या शहरात लसीची किंमत किती?
Covaxin-and-covishield

नवी दिल्ली : देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे कोरोना लस विनामूल्य देत आहे. नुकतंच 1 मे पासून लागू झालेल्या नवीन धोरणानंतर खासगी रुग्णालयातही लस उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पण खासगी रुग्णालयात 250 रुपयांपासून सुरु झालेल्या लसींच्या किंमतीत पाच ते सहा पटीने वाढ झाली आहे. भारतातील कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये लसीची किंमत 700 – 1,500 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे इतर देशांच्या तुलनेत ही किंमत सर्वाधिक आहे. (Private Hospital Corona vaccination Price)

जर तुम्ही एखाद्या खासगी रुग्णालयातून कोव्हिशील्ड लस घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला प्रति डोस 700 ते 900 रुपये खर्च करावे लागतील. तर कोव्हॅक्सिन लसीची किंमत प्रति डोस 1250 ते 1500 रुपये आहे. कोव्हिशील्ड या लसीचे उत्पादन सीरम इन्सिट्यूट करत आहेत. तर कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती भारत बायोटेककडून केली जात आहे. देशातील चार सर्वात मोठे कॉर्पोरेट रुग्णालयांचे गट खासगी क्षेत्राच्या लसीकरणाचे काम करीत आहेत. यात अपोलो, मॅक्सक्स, फोर्टिस आणि मनिपाल या रुग्णालयांचा समावेश आहे.

जगातील बहुतेक देश आपल्या नागरिकांना विनाशुल्क लस देत आहेत. यात भारताचाही समावेश असून देशात दोन्ही मॉडेल्सद्वारे लसीकरण केले जात आहे. भारतातील कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये लसीची किंमत ही इतर देशांपेक्षा सर्वाधिक आहे.

खाजगी क्षेत्रात लसीकरण शुल्कात वाढ 

दरम्यान केंद्र सरकारने लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ही लस 150 रुपये दराने विकत घेतली होती. त्यानंतर खासगी आणि सार्वजनिक या दोन्ही ठिकाणी इंजेक्शनद्वारे लस दिली जात होती. खाजगी क्षेत्राला लसीकरण शुल्क म्हणून प्रति डोस 100 रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी रुग्णालयांनीही हे दर मंजूर केले होते. पण आता बहुतांश रुग्णालय कोव्हिशील्ड लसीचे शुल्क म्हणून प्रति डोस 250 ते 300 रुपये आकारत आहेत.

खासगी रूग्णालयात लसीकरणाचा खर्च 900 रुपयांपर्यंत

मॅक्स रुग्णालयाचे प्रवक्त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी आणि वाहतुकीचा खर्च मिळून कोव्हिशील्ड लसीसाठी 660 ते 670 रुपये खर्च येतो. यातील 5 ते 6 टक्के लस निरुपयोगी होत आहेत. त्यामुळे प्रत्येक लसीच्या डोसची किंमत जवळपास 710 ते 715 रुपये प्रतिलस आहे. तर या लसीचे शुल्क म्हणून 170 ते 180 रुपये आकारले जात आहेत. यात हँड सॅनिटायझर, कर्मचार्‍यांसाठी पीपीई किट, बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट कोव्हि़शिल्डची निव्वळ किंमत 900 रुपयांपर्यंत इतके होते.

कोव्हिशील्ड
 रुग्णालय   शहर  लसीची किंमत
एच एन रिलायन्स  मुंबई  700 रुपये
अपोलो  दिल्‍ली, अहमदाबाद, चेन्‍नई, हैदराबाद, कोलकाता  850 रुपये
मॅक्‍स  दिल्‍ली, गुरुग्राम, मुंबई  900 रुपये

 

कोव्हॅक्सिन
रुग्णालय  शहर लसीची किंमत
यशोदा रुग्णालय  हैदराबाद 1,200 रुपये
फोर्टिस  दिल्‍ली, गुरुग्राम, नोएडा, जयपूर 1,250 रुपये
अपोलो  हैदराबाद, चेन्‍नई 1,250
एचएन रिलायंस  मुंबई 1,250 रुपये
मनिपाल  गोवा, बेंगलुरु 1,350 रुपये
बीजीएस ग्‍लेनलीस रुग्णालय  बेंगलुरु 1,500 रुपये
वूडलैंड्स रुग्णालय  कोलकाता 1,500 रुपये

अनेक राज्यात लसींचा तुटवडा

दरम्यान, अनेक राज्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे फक्त 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा उपलब्ध आहे. दिल्लीत दररोज सुमारे 1 लाख कोरोना लस दिल्या जात आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 26 मे पर्यंत कोविशिल्ड लस उपलब्ध होणार नाही, अशी माहिती दिली आहे.

तेलंगणात पुरेशी लस नसल्यामुळे केवळ 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण सुरु आहे. तर केरळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 1 कोटी लसींची ऑर्डर दिली होती. त्यात 75 लाख कोविशिल्ड आणि 25 लाख कोवॅक्सिनचा समावेश होता. पण अद्याप त्यांना केवळ 3 लाख लसी मिळाल्या आहेत. (Private Hospital Corona vaccination Price)

संबंधित बातम्या : 

States Lockdown Update : देशात कोणकोणत्या राज्यांमध्ये लॉकडाऊन ? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि नवे निर्बंध

कोरोनाचे नवे प्रकार आणि लाटांपासून वाचण्याचे 2 उपाय, वाचा तज्ज्ञ काय सांगतात?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI