Thyroid Weight Loss Diet | थायरॉईडमुळे वेगाने वाढतंय वजन ? वजन कमी करण्यासाठी ‘ या ‘ पदार्थांची घ्या मदत !

| Updated on: Sep 03, 2022 | 11:09 AM

Thyroid Weight Loss Diet | थायरॉईडमुळे वजन वाढत असेल तर डाएटच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करता येईल हे जाणून घेऊया.

Thyroid Weight Loss Diet | थायरॉईडमुळे वेगाने वाढतंय वजन ? वजन कमी करण्यासाठी  या  पदार्थांची घ्या मदत !
या बदलाने वजन घटेल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Thyroid Weight Loss Diet | जगभरात लाखो लोकांना थायरॉईडचा (Thyroid) त्रास सहन करावा लागतो. या समस्येमुळे कोणाचे वजन वाढते तर कोणाचे वजन कमी होऊ लागते. वजन झपाट्याने (Weight Gain) वाढू लागल्यास जाडेपणाची (Obesity)समस्या उद्भवते आणि त्यामुळे आपलं शरीर अनेक आजारांचं (Health Problems) घर बनतं. थायरॉईड सारखा आजार हा लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही होऊ शकतो. थायरॉईड झाल्यास केवळ वजनावर परिणाम होत नाही तर बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, हाय कोलेस्ट्रॉल, सांधेदुखी तसेच नैराश्य (Depression) अशी अनेक लक्षणं शरीरात दिसू लागतात. लठ्ठपणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. थायरॉईडमुळे वजन वाढत असेल तर योग्य आहार घेऊन, डाएटमध्ये थोडाफार बदल करून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करता येईल हे जाणून घेऊया.

नट्स आणि बिया

हे दोन्ही असे पदार्थ आहेत , जे झिंक (जस्त) सारख्या पोषक तत्वांचा सर्वोत्तम स्रोत मानलले जातात. चिया आणि भोपळ्याच्या बियांत झिंक हे मुबलक प्रमाणात असते. तुम्ही रात्री चिया सीड्स भिजवून सकाळी त्या दह्यात मिसळून त्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचे वजन कमी होईल, तसेच तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट रुटीनही स्वीकारू शकाल.

बिन्स

ज्या पदार्थांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ते पदार्थही थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम मानले जातात. त्यामुळे मेटाबॉलिज्म सुधारते व अयोग्य पद्धतीने तुमचे वजनही वाढत नाही. यासाठी तुम्ही राजमा सारखे बीन्स किंवा डाळींचा आहारात समावेश करू शकता. तसेच मूगडाळीचे धिरडेही खाऊ शकता, जे हेल्दी तर असतेच पण चविष्टही असते.

हे सुद्धा वाचा

अंडी

वजन कमी करण्यासाठी सेलेनियम प्रभावी मानले जाते आणि शरीरात त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्ही अंडी खाऊ शकता. थायरॉईडच्या ज्या रुग्णांना वजन कमी करायचे आहे ते प्रोटीनयुक्त अंड्यांचा त्यांच्या आहारात समावेश करू शकतात. अंड्यांचा आणखी एक फायदा म्हणजे त्यांच्या सेवनामुळे अनेक आजारांपासून आपले रक्षण होते.

हायड्रेटेड रहावे

थायरॉईडमुळे वजन वाढण्याचा त्रास होत असल्यास, तुम्ही शक्य तितके हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच नारळपाणी, लिंबूपाणी किंवा इतर द्रव पदार्थांचे सेवन करणेही लाभदायक ठरते. या हेल्दी द्रव पदार्थांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )