AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health tips : शरीरात होत असतील ‘हे’ 4 त्रास तर चुकूनही खाऊ नका बदाम! तब्येत सुधारण्यऐवजी बिघडण्याचाच धोका अधिक!

बदाम खाणं कोणाला आवडत नाही? मात्र शरीरात जर हे 4 त्रास होत असतील तर बदामांचे सेवन चुकूनही करू नका. त्यामुळे तुमची तब्येत सुधारण्याऐवजी बिघडण्याचा धोका अधिक असतो.

Health tips : शरीरात होत असतील 'हे' 4 त्रास तर चुकूनही खाऊ नका बदाम! तब्येत सुधारण्यऐवजी बिघडण्याचाच धोका अधिक!
बदामImage Credit source: tv9
| Updated on: Sep 02, 2022 | 11:10 AM
Share

आपले चांगले आरोग्य ही दीर्घायुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे, जी टिकवून ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात दीर्घायुष्याची कल्पना सर्वांना खरी वाटणार नाही, पण तसे करणे शक्य आहे. जीवनशैलीत (Changes in lifestyle) छोटे-छोटे बदल केल्यास आपण तसे करण्यास सक्षम ठरतो. या छोट्या बदलांमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयीही जोडलेल्या आहेत. सर्वांनाच माहीत आहे, की सुका मेवा हा आपल्या शररातील पोषक तत्वांची पूर्तता करण्यासाठी गरजेचा आहे आणि त्याच्या सेवनाने अनेक आजारही दूर राखण्यात यशस्वी ठरतो. यामध्ये सर्वांनाचा खायला आवडतात ते म्हणजे बदाम. बदाम (Almonds) हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण त्याचे सेवन करू शकततात. बदामात मुबलक प्रमाणात पोषक तत्वं आणि अँटी-ऑक्सिडेंट्स (Anti oxidants) असतात, जे आपल्या शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

आवश्यक सत्वे

व्हिटॅमिन बी2 (रायबोफ्लेविन) , फॉस्फरस आणि कॉपरचा मोठ्या प्रमाणात स्त्रोत बदामात असतो, त्याचे नियमित सेवन केल्याने आपल्याला निरोगी जीवन मिळू शकते. रोज एक मूठभर बदाम खाल्यामुळे हृदयाच्या समस्या, जाडेपणा आणि मेंदूच्या समस्या दूर होऊ शकतात. एक मूठ बदामामध्ये (अंदाजे 28 ग्रॅम) 3.5 ग्रॅम फायबर, 6 ग्रॅम प्रोटीन आणि 14 ग्रॅम फॅट असते. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नशिअम आणि मँगेनीज हे मुबलक प्रमाणात असतात.

रात्री भिजवून ठेवून सकाळी खाणे जास्त फायदेशीर

शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक प्रथिने, फॅट, जीवनसत्वे आणि मिनरल्स यांची पूर्तता करणाऱ्या बदामाचे सेवन बहुतांश लोक करतात. विशेषत: थंडीत बदाम खाण्यास बरेच लोक पसंती देतात. मात्र बदाम भिजवून खावेत की नुसतेच, कोरडे खावेत, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम असतो. नुसते बदाम खाण्यापेक्षा ते रात्री भिजवून ठेवून सकाळी खाणे जास्त फायदेशीर असते. भिजलेल्या बदामांमध्ये पौष्टिक तत्व वाढतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. खरंतर बदामाच्या सालांमध्ये टॅनिन नावाचे तत्व आणि खास ॲसिड्स असतात, जे बदामातील पोषक तत्वं शरीरात शोषू देत नाहीत. त्यामुळे बदाम भिजवून त्यांची सालं काढून खाल्याने बदामातील पोषक तत्वं संपूर्ण प्रमाणात शरीराला मिळतात व नीट शोषली जातात.

बदाम खाण्याचे फायदे :

  1. – रक्तप्रवाह आणि स्मरणशक्ती दोन्ही सुधारतात.
  2. – पचनक्रिया सुधारते आणइ वजन कमी करण्यास मदत होते.
  3. – गर्भावस्थेत बदाम खाल्याने फॉलिक ॲसिड योग्य प्रमाणात मिळते आणि न्यरल ट्यूबमधील दोषांपासून बचाव होतो.
  4. – हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
  5. – बॅड कोलेस्ट्ऱॉल कमी होते.

बदामाच्या तेलाचाही होतो खूप फायदा –

  1. – डोक्याला लावायच्या मेहंदीमध्ये बदामाचे तेल मिसळून लावल्याने केस काळे होतात.
  2. – बदाम तेलात आयर्न (लोह) मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे हे तेल सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
  3. – बदामाच्या तेलाचे सेवन केल्यामुळे पोट दुखणे, पोट साफ न होणे, या समस्या दूर होतात.
  4. – बदामाच्या तेलाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
  5. – बदाम तेलाचे सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्ऱॉल कमी होते व गुड कोलेस्ट्रॉल वाढते.

बदाम सूप पिण्याचे फायदे :

हाय फायबर, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, जस्त, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि बी व्हिटॅमिनसारख्या अनेक तत्वांनी भरपूर असलेले बदामाचे सूप पिणेही शरीरासाठी फायदेशीर असते. वाढत्या वयातील मुलांसाठी बदामाचे सूप खूप लाभदायक असते. मुलांना जर सूप आवडत नसेल तर त्यांना बदाम भिजवून किंवा भाजून खायला देता येऊ शकतात.

खरंतर बदाम खाणं सर्वांनाच आवडतं मात्र काही लोकांना बदाम खाल्याने ॲलर्जी होते. त्यामुळे बदाम कोणी खावे व कोणी खाऊ नयेत, असा प्रश्न उपस्थित होतो. शरीरात हे 4 त्रास होत असतील बदाम खाऊ नयेत :

  1. – पचनासंबंधित समस्या असेल तर बदाम खाऊ नका. बदाम खायची इच्छा असेलच तर केवळ 2-3 बदाम खावेत.
  2. – त्वचेशी संबंधित काही त्रास होत असेल बदाम खाणे टाळावे.
  3. – तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर बदाम टाळावेत.
  4. – ब्लड प्रेशर खूप जास्त असेल तर बदामाचे सेवन करू नये.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.