High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचा आजार का होतो, कोणत्या चुका ठरतात कारणीभूत..

हाय कोलेस्ट्रॉल हा एक छुपा घातक आजार आहे. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे, हे फार कमी लोकांच्या लक्षात येते. दैनंदिन जीवनातील अनेक चुकांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या...

High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचा आजार का होतो, कोणत्या चुका ठरतात कारणीभूत..
High Cholesterol
| Updated on: Jul 24, 2026 | 10:42 PM

बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी जर वाढली असेल तर यास कमी करण्यावर काम केले पाहिजे. कारण या कारणाने हार्ट अटॅक ते येऊ शकतो आणि परिस्थिती जीवघेणी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते बॅड वा हाय कोलेस्ट्रॉल (एलडीएल) ला सायलन्ट किलर देखील म्हणतात. भारतीय आहाराबाबत बोलायचे झाले तर आजच्या काळात सर्वात ते बिघडलेले आहे. दरदिवशी मैद्याने तयार केलेले पदार्थ, साखरेचे पदार्थ आणि तेलकट पदार्थ आणि कोणत्याही वेळी काहीही सेवन करण्याची सवय धोकायदायक बनली आहे.तेलकट पदार्थांचे सेवन आणि फिजिकली एक्टीव्ह न राहिल्याने आपण बॅड कोलेस्ट्रॉलचे शिकार होऊ शकतो.

आज आपण पाहूयात कोणत्या सवयी तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉलचे रुग्ण बनवतात. या संदर्भात टीव्ही ९ भारतवर्षे यांच्याशी डॉ. अमर सिंघल ( संचालक, इंटर्नल मेडिसिन, श्री बालाजी एक्शन मेडीकल इन्स्टिट्यूट दिल्ली)यांच्याशी चर्चा केली आहे.

हाय कोलेस्ट्रॉलवर एक्सपर्ट काय म्हणाले

हाय कोलेस्ट्रॉल एकाच दिवसात वाढत नाही. तर आपल्या दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयीने याला जबाबदार ठरतात. जास्त तळलेले खाणे, जंक फुड, प्रोसेस्ड फूड, प्रोसेस्ड फूड, गोड पेयं आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थांच्या अधिक सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रालचे प्रमाण वाढते.

लोक अनेकदा त्या चुका रिपीट करतात. एक्सपर्टच्या मते फिजिकल एक्टीव्ह न राहाणे आणि उशीरापर्यंत एकाच जागी बसणे, वाढते वजन, ध्रुमपान, मद्याचे जास्त सेवन आणि पुरेशी झोप न घेणे ही देखील याची कारणे असू शकतात.

अनेक प्रकरणात डायबिटीज, थॉईराईडचा आजार , किडनी संबंधिक आजार आणि जेनेटिक आजार या कारणाने देखील कोलेस्ट्रॉल वाढू शकते. सुरुवातीला कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी करणेच फायद्याचे असते.

आहाराची काळजी

संतुलित आहार , रोज किमान ३० मिनिटं शारीरिक व्यायाम करावा, वजन नियंत्रित राखावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार आणि औषधे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलला बऱ्याच प्रमाणाने नियंत्रण ठेवता येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us