AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Monsoon Update : आभाळ फाटणार, राज्यात पावसाचा रेड अलर्ट, हवामान विभागाकडून मोठा इशारा

राज्यात पुन्हा एकदा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे, पावसाने चांगला जोर पकडला असून, महाराष्ट्रात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

IMD Monsoon Update : आभाळ फाटणार, राज्यात पावसाचा रेड अलर्ट, हवामान विभागाकडून मोठा इशारा
IMD Monsoon UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 10:16 PM
Share

महाराष्ट्रात 1 जुलै ते 8 जुलै या काळात चांगला पाऊस झाला होता, या पावसानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परंतु त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिली, पाण्याभावी पीके सुकू लागली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वीस जुलैपासून पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून (IMD) पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज  

येत्या चार ते पाच दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  गेल्या दोन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक धरणे भरणार असून, पाण्याची चिंता दूर होणार आहे. पावसासंदर्भात माहिती घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या मेघदूत अ‍ॅपचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पेरणी करावी अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख एसडी सानप यांनी दिली आहे.

कोकणात पावसाचा जोर वाढणार 

दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील चार ते पाच दिवस कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. किनार पट्टी भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यात आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपलं

दरम्यान दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील काही गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच गुरुवारी विरारवरून डहाणूच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे गाड्या देखील पावसामुळे विस्कळीत झाल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा