AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : स्मरणशक्ती कमी होणं आणि लक्ष न लागणं, अशी लक्षणे असतील तर ही बातमी एकदा वाचाच!

सेल थेरपीच्या उपयोग करून मेंदूच्या कार्याचे पुनरुज्जीवन करणे आणि ऑप्टिमाइझ करणे शक्य आहे. ब्रेन फॉग म्हणजे त्या व्यक्तींना स्पष्टपणे विचार करणे किंवा गोष्टी लक्षात ठेवणे आव्हानात्मक वाटू शकते. याबद्दल डॉ. प्रदीप महाजन यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

Health : स्मरणशक्ती कमी होणं आणि लक्ष न लागणं, अशी लक्षणे असतील तर ही बातमी एकदा वाचाच!
| Updated on: Aug 08, 2023 | 5:29 PM
Share

मुंबई : स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचणी येणे, थकवा येणे, विचारात सुसंगतता नसणे, चिडचिडेपणा, सुस्तीची भावना येणं अशी लक्षणं दिसून आल्यास त्याला ब्रेन फॉग म्हणतात. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्टेमआरएक्स नावाची क्रांतिकारी वैद्यकीय प्रगती एक आशादायक उपाय ठरत आहे. सेल थेरपीच्या उपयोग करून मेंदूच्या कार्याचे पुनरुज्जीवन करणे आणि ऑप्टिमाइझ करणे शक्य आहे. ब्रेन फॉग म्हणजे त्या व्यक्तींना स्पष्टपणे विचार करणे किंवा गोष्टी लक्षात ठेवणे आव्हानात्मक वाटू शकते. याबद्दल डॉ. प्रदीप महाजन यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

हे तणाव, झोपेचा अभाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, वैद्यकीय इतिहास यासारख्या विविध कारणांमुळे होऊ शकते. शिवाय जसजसे वय वाढते तसतसे याचे प्रमाण अधिक वाढते. स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे आणि एकूणच संज्ञानात्मक क्षमतांवर त्याचा परिणाम होतो. ब्रेन फॉगिंग दरम्यान न्यूरोप्लास्टिकिटी वाढते जी मज्जासंस्थेची आंतरिक किंवा बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद म्हणून त्याची रचना, कार्ये किंवा दुखापतीनंतर पुनर्रचना करून बदलण्याची क्षमता असते, जसे की स्ट्रोक किंवा मेंदूला झालेली दुखापत.

स्टेमआरएक्स ही एक अत्याधुनिक वैद्यकीय प्रगती जी पुनरुत्पादक औषधाच्या क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करते आहे. संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या टीमने विकसित केलेले, स्टेमआरएक्स मेंदूचे आरोग्य आणि संज्ञानात्मक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी मेसेन्कायमल पेशींच्या क्षमतेचा उपयोग करते. स्टेमआरएक्स मेंदूतील खराब झालेल्या किंवा बिघडलेल्या ऊतींची दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी पेशींचा वापर करून, रिजनरेटिव्ह औषधाच्या तत्त्वांवर कार्य करते.

या विशेष पेशींमध्ये विविध प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरित होण्याची अद्वितीय क्षमता असते, ज्यामुळे ऊतींच्या दुरुस्तीमध्ये फायदा होतो आणि उपचारांना चालना मिळते. मेंदूमधील मेसेन्कायमल पेशी या नवीन न्यूरल नेटवर्क्सच्या वाढीस उत्तेजन देण्यासाठी आणि विद्यमान न्यूरॉन्समधील संबंध वाढविण्याचे कार्य करतात. ही प्रक्रिया मेंदूच्या खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यात आणि संज्ञानात्मक कार्ये ऑप्टिमाइझ करण्यात मदत करते. सेल आधारीत थेरेपीमुळे संज्ञानात्मक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा नोंदविण्यात आली आहे. रुग्णांनी देखील या उपचाराच्या स्वरूपाबद्दल समाधान व्यक्त केले आहे, ज्यामध्ये कमीतकमी कालावधीत रुग्णांना या समस्येतून मुक्त होता येते.

स्टेमआरएक्स मेंदूच्या आरोग्याच्या आणि संज्ञानात्मक वाढीच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण विकासाचे प्रतिनिधित्व करते. स्टेम पेशींच्या पुनरुत्पादक क्षमतेचा वापर करून, ही अत्याधुनिक थेरपी ब्रेन फॅाग आणि संज्ञानात्मक घट यापासून आराम मिळवणाऱ्या व्यक्तींना आशा देते. दीर्घकालीन परिणामकारकता दृढ करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे, स्टेमआरएक्समध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या सुधारण्याची क्षमता आहे, ज्यामुळे मानसिक समस्यांना दूर करुन निरोगी आयुष्य जगता येऊ शकते.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.