AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : दारूचा नाद लय वाईट, ‘या’ दिग्गज खेळाडूचं करिअर बर्बाद, IPL मध्येही होती दहशत!

काही खेळाडूंना नशिबाची साथ मिळते आणि कमी वेळातच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळते. परंतु काही वाईट सवयींमुळे अशा अनेक खेळाडूंचं बर्बाद होतं. असाच एक खेळाडू आहे. ज्याने क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आता तो खेळाडू गायबच झाला आहे. 

Cricket : दारूचा नाद लय वाईट, 'या' दिग्गज खेळाडूचं करिअर बर्बाद, IPL मध्येही होती दहशत!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 08, 2023 | 1:51 PM
Share

मुंबई : प्रत्येक खेळाडूचं आपल्या देशासाठी खेळण्याचं स्वप्न असतं. मात्र सर्वांचंच ते पूर्ण होतं असं नाही. कारण कित्येकांचं फक्त स्वप्नच राहून जातं. काही खेळाडूंना नशिबाची साथ मिळते आणि कमी वेळातच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळते. परंतु काही वाईट सवयींमुळे अशा अनेक खेळाडूंचं बर्बादही झालं आहे. असाच एक खेळाडू आहे. ज्याने क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आता तो खेळाडू गायबच झाला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू न्यूझीलंड संघाचा असून त्याने कॉमामधून बाहेर आल्यानंतर शतक ठोकलं होतं. त्यामुळे हा खेळाडू सर्वांच्या चांगलाच लक्षात राहिला. आयपीएलमध्येही पुणे वॉरियर्स संघाकडून तो खेळला होता. पॉवर प्लेमध्ये तो चांगलीच धुलाई करायचा.

वयाच्या 14 व्या वर्षी त्याला वडिल सोडून गेले होते. एकटाच तो लहानाचा मोठा झाला. या खेळाडूचेस वडीलही क्लब क्रिकेटर होते. या खेळाडूने आपल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवली. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये या खेळाडूने संघात आपली जागा मिळवली होती. मात्र त्याला दारूची वाईट सवय लागली होती.  हीच सवय त्याला पुढे महागात पडली, 2013 साली  क्राइस्ट चर्च बाहेर त्याची कोणासोबत भांडणे झालीत. यावेळी त्याला इतकी मारहाण करण्यात आली की तो कॉमामध्ये गेलेला.

जवळपास 56 तास तो कॉमामध्ये होता त्यानंतर त्याने कमबॅख करताना तुफानी शतक करत पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. हा योद्धा खेळाडू म्हणजे न्यूझीलंड संघाचा ऑल राऊंडर खेळाडू जेसी रायडर आहे.

2014 साली कमबॅक केल्यावर परत एकदा वादात सापडला. भारत दौऱ्यावर जाताना नियमांचं पालन न केल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर 2015  च्या वन डे वर्ल्ड कपमध्येही त्याचं नाव जवपास पक्क होतं. मात्र त्याने न्यूझीलंड ए संघासोबत युएईमध्ये जाण्यास नकार दिला त्यामुळे त्याला वनडे वर्ल्ड कपमधूनही वगळण्यात आलं.

दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये तो इंडियन कॅपिटल्सकडून खेळला आणि त्यानंतर अनेक वर्षांनी चाहत्यांनी त्याला पाहिलं होतं. जेसी रायडरला दारूचं व्यसन आणि इतर वाईट सवयी करिअर बर्बाद होण्याला कारणीभूत ठरल्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?