पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचा सर्वाधिक धोका, लक्षणे तापासारखीच; साचलेल्या पाण्यात जाऊ नका

| Updated on: Aug 03, 2021 | 9:30 AM

पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात पूर येतो. अनेक ठिकाणी पाणी साचतं. डबकी तयार होतात. अशावेळी या घाणेरड्या पाण्यात जाऊ नका. (What is Leptospirosis? Causes and precautions for the monsoon disease)

पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचा सर्वाधिक धोका, लक्षणे तापासारखीच; साचलेल्या पाण्यात जाऊ नका
Leptospirosis
Follow us on

नवी दिल्ली: पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात पूर येतो. अनेक ठिकाणी पाणी साचतं. डबकी तयार होतात. अशावेळी या घाणेरड्या पाण्यात जाऊ नका. नाही तर लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ शकते. विषाणूमुळे पसरणारा हा आजार आहे. ताप येणं हे याचं प्रमुख लक्षण आहे. मात्र, हा संसर्गजन्य आजार नाही. तरीही काळजी घेणं महत्त्वाचं असतं. (What is Leptospirosis? Causes and precautions for the monsoon disease)

उंदराचं मलमूत्रं जर पाण्यात मिसळलेलं असेल आणि त्या पाण्याशी संपर्क आल्यास लेप्टो होतो. दुषित पाणी, खाद्यपदार्थ आणि मातीवरही उंदराचं मलमूत्रं पडलेलं असेल आणि त्याच्या संपर्कात आल्यावरही हा आजार होतो.

त्वचा आणि डोळ्याच्या मार्फत बॅक्टेरियाचा फैलाव

लेप्टोचा बॅक्टेरिया त्वचा, तोंड, डोळे आणि नाकावाटे शरीरात पोहोचतो. ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, अशा ठिकाणी लेप्टोचे रुग्ण अधिक आढळतात. मुसळधार पाऊस झाल्याने पूर येतो. काही ठिकाणी पाणी अधिककाळ पाणी साचतं. ज्या शेतात उंदरांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणीही लेप्टोचे रुग्ण आढळतात. राफ्टिंग किंवा स्विमिंगशी संबंधित लोकांना पावसळ्यात लेप्टोचा धोका अधिक असतो.

7 ते 10 दिवसात लक्षणे दिसतात

तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे 7 ते 10 दिवसात रुग्णांमध्ये लेप्टोची लक्षणे दिसतात. काही प्रकरणात उशिरानेही लेप्टोची लक्षणे आढळून येतात. प्रचंड ताप, डोकेदुखी, शरीर दुखणे, अंग थरथरणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे, लघवीला त्रास होणे, त्वचेला चट्टे पडणे आदी लक्षणे साधारणपणे लेप्टो रुग्णात आढळून येतात. त्याशिवाय रुग्णांना उलटी आणि जुलाबचा त्रासही होत असल्याचं आढळून येतं. या फ्ल्यूची लक्षणे मॅनिनजाइटिसशी मिळते जुळते आहेत. पावसाळ्यात यापैकी काहीही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एलायजा टेस्टने तपासणी

अशा प्रकारची लक्षणे दिसल्यावर रुग्णांची रक्त चाचणी केली जाते. लेप्टो झाल्यास पांढऱ्या पेशी कमी होऊ शकतात. या आजाराची लागण झाली की नाही याची माहिती करून घेण्यासाठी एलायजा टेस्ट करावी लागते. भारतात ज्या ठिकाणी वादळ आणि पूर येतो, त्या ठिकाणी लेप्टो रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात.

शरीराच्या अनेक भागांवर परिणाम

हा आजार बळावला तर त्याचा शरीराच्या विविध भागांवर परिणाम होतो. त्यात किडनी किंवा लिव्हर फेल होऊ शकतं. हार्टफेल होऊ शकतं. मेंदूला सूज येऊ शकते. मात्र, अँटिबायोटिक्स घेतल्याने त्यावर मात करता येऊ शकते. साधारणपणे लेप्टोचा रुग्ण एक आठवड्याच्या आत बरा होतो. 5 ते 10 टक्के रुग्णांना आजारातून बरे होण्यास विलंब होतो.

बचाव कसा कराल

>> पाणी भरलेल्या ठिकाणी जाऊ नका
>> मातीला हाताने स्पर्श करू नका
>> प्राण्यांच्या अंथरुणाला हात लावू नका
>> जखम झाली असेल तर वॉटर प्रुफ बँडेज लावा
>> उकळून पाणी प्या
>> पाय स्वच्छ ठेवा (What is Leptospirosis? Causes and precautions for the monsoon disease)

 

संबंधित बातम्या:

सतर्क राहा, कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टअखेरीस येण्याची शक्यता : विजय वडेट्टीवार

Corona Cases In India | तिसरी लाट याच महिन्यात येणार, महाराष्ट्र, केरळात रुग्णसंख्या वाढणार?; वाचा अहवाल काय सांगतो?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी घट, अ‍ॅक्टिव्ह केसेस मात्र वाढत्याच

(What is Leptospirosis? Causes and precautions for the monsoon disease)