सतर्क राहा, कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टअखेरीस येण्याची शक्यता : विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) येण्याची शक्यता आहे.

सतर्क राहा, कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टअखेरीस येण्याची शक्यता : विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार


नागपूर : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथील करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही, केवळ चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली. ते नागपुरात बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “ॲागस्टच्या शेवटपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथील करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही. फक्त चर्चा झाली. निर्बंध शिथील करण्याबाबत अंतिम निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री घेणार आहेत”

देशातील 10 जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. व्यापाऱ्यांच्या भावना योग्य आहे. पण कोरोनाच्या बाबतीत ढिलाई महागात पडू शकते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभमीवर सरकार सावध पावलं टाकतेय, असं वडेट्टीवार म्हणाले.

व्यापाऱ्यांचा जीवही महत्त्वाचा आहे. व्यापाऱ्यांच्या भावनेशी सहमत राहून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असं वडेट्टीवारांनी सांगितलं.

देशातील कोरोना रुग्णसंख्या

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दीड हजाराने घट झाली. कालच्या दिवसात 40 हजार 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्याही वाढताना दिसत आहे. कालच्या दिवसात 422 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

गेल्या 24 तासात भारतात 40 हजार 134 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 422 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 946 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

VIDEO : विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? 

संबंधित बातम्या  

Corona Cases In India | तिसरी लाट याच महिन्यात येणार, महाराष्ट्र, केरळात रुग्णसंख्या वाढणार?; वाचा अहवाल काय सांगतो?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी घट, अ‍ॅक्टिव्ह केसेस मात्र वाढत्याच

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI