Health Tips: यूरिक अ‍ॅसिडची समस्या त्रास देतेय ? वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि उपचारपद्धती

यूरिक अ‍ॅसिडची समस्या झाल्यावर अनेक शारीरिक समस्या देखील उद्भवतात. जर तुम्हाला सुद्धा यूरिक अ‍ॅसिडची समस्या त्रास देत असेल तर अशा वेळेस काही उपचार पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे.

Health Tips: यूरिक अ‍ॅसिडची समस्या त्रास देतेय ? वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि उपचारपद्धती
Uric acidचं प्रमाण शरीरात वाढणं, ही चांगली बाब नाही!
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 9:45 PM

Uric Acid Health Problem: हल्ली प्रत्येकाला युरिक अ‍ॅसिडची (Uric Acid) समस्या त्रास देत आहे. महिला व पुरुष या दोघांमध्येही समस्या हल्ली जोर धरत आहे. ही अशी एक समस्या आहे, या समस्येमुळे शरीरात विशिष्ट पदार्थाची निर्मिती होते. या पदार्थामुळे आपल्या शरीरातील किडनीवर विपरीत परिणाम होतो. आपल्या किडनीची कार्यक्षमता व्यवस्थित काम करत नाही. यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid issue) चा थेट विपरीत परिणाम आपल्या किडनीवर होतो. शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढण्यास किडनी फेल सुद्धा होऊ शकते. जर आपल्या शरीरामध्ये नेहमी यूरिक अ‍ॅसिड वाढत असेल तर अशावेळी आपल्याला हाय ब्लडप्रेशर (High BP) , सांधेदुखी उठता – बसताना त्रास, अंगावर सूज येणे ,यासारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने आपल्याला लघवी करताना त्रास होतो. अशावेळी आपल्या शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे नेमके कोणते कारण आहे हे सुद्धा जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे.

यूरिक अ‍ॅसिडचे कारण

बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये यूरिक अ‍ॅसिडचे निर्माण होण्यामागे वेगवेगळी कारणे देखील असतात. परंतु आपण जर वाटाणे , पालक, मशरूम, चिकन इत्यादी इत्यादी पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर यामुळे सुद्धा युरिक अ‍ॅसिड वाढण्याची शक्यता असते. आपल्या शरीरामध्ये प्यूरीनची मात्रा वाढते तेव्हा युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. चला तर मग जाणून घेऊया यूरिक अ‍ॅसिड वाढण्याचे काही प्रमुख कारणे.

  1. -आनुवांशिकता
  2. चुकीच्या आहार पद्धती
  3. अल्कोहोल चे अधिक सेवन
  4. बाहेरचे पदार्थ खाणे
  5. डायबिटीज कारणामुळे
  6. कीमोथेरेपी कारणामुळे
  7. जास्त वेळ उपाशी राहणे

शरीरात यूरिक एसिड वाढण्याची लक्षणं

जेव्हा आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड ची कमतरता असते किंवा शरीरामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असेल तर अशा वेळी प्रत्येकाला वेगवेगळी लक्षणे जाणवू लागतात. तसे पाहायला गेले तर ही लक्षणे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असतात. शरीरात जास्त वेळ यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास आपल्याला भविष्यात गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, गुडघेदुखी ,शरीरामध्ये गाठ किडनी यासारख्या समस्या जोर धरतात.

  • – सांधेदुखी मध्ये वेदना आणि सूज होणे
  • – सांध्याना हात लावल्यास वेदना जाणवणे
  • – किडनी संदर्भातील समस्या
  • – किडनी स्टोनची शंका
  • – पाठ आणि कंबर मध्ये वेदना
  • – वारंवार लघवी लागणे
  • -चालताना उठताना वेदना जाणवणे
  • – हाताची बोटे सुजणे

नियंत्रण कसं ठेवायचं?

या समस्येपासून जर मुक्तता मिळवायची असेल तर जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे.नेहमी भरपूर पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

ज्या पदार्थांमध्ये प्यूरीन उपलब्ध असते त्या पदार्थांचे सेवन मर्यादेपेक्षा जास्त करू नये त्याचबरोबर रिफाइंड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ यांच्या पासून लांबच राहा.

  • स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी इत्यादी पदार्थ यूरिक एसिड  कमी करण्याच्या कामी येतात, अशावेळी या दोन्ही पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करा तसेच ज्या पदार्थांमध्ये फायबर जास्त असतात असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील युरिक ऍसिड नियंत्रणात राहते.
  • एक ग्लासभर पाण्यामध्ये तीन चमचे एप्पल साइडर विनेगर टाकून प्यायल्याने युरीक ॲसिड कमी होते.
  • यासोबतच नियमितपणे योग्य ते एक्सरसाइज व योगा करा. नेहमी शारिरिक दृष्ट्या सक्रीय रहा.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या :

पोटात गॅस झालाय? पोटातली Acidity दूर करणारी 5 पेय , ज्यानं मिटेल सगळी चिंता!

सकाळी उपाशी पोटी चुकून सुद्धा खाऊ नका हे पदार्थ अन्यथा परिणाम होतील गंभीर!

Oil | शरीरातील समस्या दूर करा फक्त तेलाच्या मदतीने! घरात असायलाच हवे असे तेलाचे 5 प्रकार

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.