पायाची शिर चढल्यावर काय करायचं?

शरीराच्या कोणत्याही भागात शिर चढली तर त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शारीरिक कमकुवतपणा. बऱ्याच वेळा असे होते जेव्हा आपले स्नायू संकुचित होऊ लागतात (स्नायूंचे आकुंचन), ज्यामुळे शिरा चढण्याची समस्या उद्भवते.

पायाची शिर चढल्यावर काय करायचं?
vein cramp
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 02, 2023 | 11:04 AM

अनेकदा तुम्हाला असं वाटलं असेल की चालताना किंवा धावताना अचानक पायाची शिर चढली, त्यामुळे तीव्र वेदना होतात आणि ती असह्य होते. खांदे किंवा मानेच्या शिरा चढणे देखील सामान्य आहे. अशा वेळी दैनंदिन जीवनातील सामान्य कामे आणि नियमित कामकाज अवघड होऊन बसते. जर तुम्हाला कधी अशा समस्येला सामोरे जावे लागले तर अजिबात घाबरू नका, तर काही सोप्या युक्त्या फॉलो करा. शरीराच्या कोणत्याही भागात शिर चढली तर त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शारीरिक कमकुवतपणा. बऱ्याच वेळा असे होते जेव्हा आपले स्नायू संकुचित होऊ लागतात (स्नायूंचे आकुंचन), ज्यामुळे शिरा चढण्याची समस्या उद्भवते. अनेकदा स्नायूंमध्ये गाठी तयार होतात, ज्यामुळे तीव्र वेदना होतात. अनेकदा झोपताना किंवा थकल्यानंतरही असे घडते.

शिरा चढण्याची लक्षणे

  • पायाच्या खालच्या भागात ताण येणे
  • शिरामध्ये अचानक तीव्र वेदना –
  • चालण्यास त्रास
  • मानेभोवती तीव्र वेदना

शिरा चढल्यावर करा हे उपाय

  • पायात गरम तेलाचा मसाज करा, यामुळे अस्वस्थता दूर होऊ शकते
  • गरम पाण्याच्या पिशवीच्या साहाय्याने बाधित भागाला शेकवता येऊ शकतं, त्यानेही आराम मिळेल
  • आपण बर्फाने सुद्धा शेक देऊ शकता, जे फायदेशीर मानले जाते.
  • जेव्हा पायांची शिरा चढते तेव्हा तुम्ही सरळ उभे राहिलात तरी तुम्हाला आराम मिळेल

शिरा चढण्याच्या समस्येला कधीही सामोरे जावे लागू नये असे वाटत असेल तर रोजच्या आहारात पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता भासू नये. रोजच्या जेवणात मिनरल्स घेत राहा. संत्र्याचा रस, खजूर, दही, बटाटे, टोमॅटो, गरम दुधासह हळद आणि रताळे यांचा आहारात समावेश करावा.