AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत थेट भूकंप, पुतिन यांच्या शब्दाने मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतूनच पहिला मोठा हादरा

रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर होते. यादरम्यान काही महत्वाची करार झाली. हेच नाही तर पुतिन आणि नरेंद्र मोदी ज्याप्रकारे बोलत होते, त्यानंतर जगाची झोप उडाली. अमेरिका गेल्या काही दिवसांपासून भारतावर दबाव टाकत होती. त्यामध्येच आता अमेरिकेला मोठा झटका बसला.

अमेरिकेत थेट भूकंप, पुतिन यांच्या शब्दाने मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतूनच पहिला मोठा हादरा
Donald Trump
| Updated on: Dec 06, 2025 | 9:57 AM
Share

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर होते. आज सकाळी ते रशियाकडे रवाना झाले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. अनेक कार्यक्रम आणि करार भारत रशियामध्ये झाले. तब्बल 7 मंत्र्यांसह पुतिन भारताच्या दाैऱ्यावर होते. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धानंतर ते पहिल्यांदाच भारताच्या दाैऱ्यावर पोहोचले. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर मोठा दबाव अमेरिकेचा आहे. मात्र, पुतिन भारत दाैऱ्यावर असताना भारताने ऊर्जाशी संबंधित अनेक मोठे करार अमेरिकेच्या नाकावर टिच्चून रशियासोबत केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला आश्वासन दिले आहे की भविष्यात तेल, वायू आणि ऊर्जा संसाधनांचा पुरवठा अखंडपणे सुरू राहील. यामुळे अमेरिकेला चांगल्याच मिरच्या लागल्याचे स्पष्ट दिसतंय.

अमेरिकेतील पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी पुढील जागतिक समीकरणावर मोठे भाष्य केले आहे. ज्यामुळे वॉशिंग्टनमध्ये चांगलीच खळबळ उडाली. त्यांनी स्पष्ट म्हटले की, भारत कायमच त्यांच्या स्वत: च्या हिताची निर्णय घेतो. जनतेने पंतप्रधान मोदींना याच कारणासाठी निवडले आहे. त्यांना इतर देशांना खुश करण्यामध्ये अजिबातच रस नाही, ते त्यांच्या देशाचे हित निवडतात.

त्यांनी पुढे म्हटले की, मला विश्वास आहे की, भारत हा जगातील उदयोन्मुख शक्तींपैकी एक आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत बाह्य दबावाचे पालन करण्याची आवश्यकता नक्कीच नाही, ऊर्जा खरेदीच्या बाबतीतही. शेवटी ऊर्जा खरेदी कोणाकडून करायची किंवा काय हा त्यांचा निर्णय आहे. रुबिन यांनी अमेरिकेला मोठा धक्का देत थेट अमेरिकेच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केली.

त्यांनी म्हटले, वॉशिंग्टन स्वतः रशियाकडून इंधन आणि काही साहित्य आयात करते. मात्र, भारताला रशियाकडन ऊर्जा खरेदीसाठी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जगापुढे अमेरिकेचे दुटप्पी धोरण पुढे आलंय. अमेरिका आजही रशियाकडून विविध प्रकारची ऊर्जा खरेदी करते. जर तुम्हाला वाटते की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केली नाही पाहिजे तर त्यांना तसा काही पर्याय उपलब्ध करू द्या.

जेव्हा भारताला तुम्ही स्वस्त आणि स्थिर तेल देऊ शकत नाही तेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणे याला अर्थ नाही. भारताने आता पुन्हा एकदा स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय दबावाखाली आपली ऊर्जा रणनीती बदलणार नाही. देशाच्या आर्थिक हितासाठी ते योग्य तो निर्णय घेतली. त्यामध्येच पुतिन यांनीही भारताला मोठे आश्वासन दिले आहे. शेवटी आता अमेरिकेच्या हाती काहीच लागले नसल्याचे यावरून दिसत आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.