Putin India Visit: पुतिन भारतात येताच अमेरिकेत खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
Putin India Visit: रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांचा भारत दौरा पाहून अमेरिकेत खळबळ माजली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत मोठी खळबळ माजली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी आपली राष्ट्रीय सुरक्षा धोरणे जाहीर केली आहेत. या धोरणात भारतासोबतच्या संबंधांना मजबूत करण्यावर भर देण्यात आली आहे. याशिवाय, दक्षिण चीन समुद्रात चीनविरोधात एकट्याने मोर्चेबंदी करण्याऐवजी भारत आणि जपानसारख्या देशांसोबत सहकार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
युरोपियन देशांवर टीका
ट्रम्प प्रशासनाकडून जारी केलेल्या ३३ पानांच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात युरोपियन देशांवर टीका करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “युरोपियन देश लोकशाही नष्ट करत आहेत आणि युक्रेनमध्ये शांततेला अडथळा आणत आहेत. युक्रेनमधील युद्ध संपवण्याचे अमेरिकेचे प्रयत्न तेथील अधिकाऱ्यांकडून हाणून पाडले जात आहेत.”
सुरक्षा दस्तऐवजानुसार, युरोपियन अर्थव्यवस्थांना स्थिर करण्यासाठी, युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियासोबत रणनीतिक स्थिरता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी शत्रुत्व संपवणे आवश्यक आहे. यात आशिया आणि मध्य पूर्वेशी अमेरिकेच्या संबंधांचाही समावेश करण्यात आला आहे.
‘बर्डन-शिफ्टिंग’ हे धोरण अवलंबणार
ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की ते ‘बर्डन-शिफ्टिंग’ हे धोरण अवलंबणार आहेत. याचा उद्देश युरोपला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा आणि मित्र देशांच्या गटाला एकत्रितपणे काम करण्यास सक्षम करण्याचा आहे. यात देशाच्या लष्करी उपस्थितीला पुन्हा समायोजित करण्याचा उल्लेख आहे, जेणेकरून तात्काळ धोक्यांचा सामना करता येईल आणि ज्या क्षेत्रांचे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सापेक्ष महत्त्व गेल्या काही दशकांत किंवा वर्षांत कमी झाले आहे, त्यांपासून दूर राहता येईल.
राष्ट्रीय सुरक्षा धोरणात चीनला आर्थिक आव्हान म्हणून संबोधले गेले आहे. असे म्हटले आहे की वॉशिंग्टन चीनसोबत असलेले असलेले आर्थिक संबंध अमेरिका पुन्हा संतुलित करेल, अमेरिकेचे आर्थिक स्वातंत्र्य पुनर्संचयित करण्यासाठी परस्पर व्यवहार आणि निष्पक्षतेला प्राधान्य देईल. त्यात असेही म्हटले आहे की इंडो-पॅसिफिक प्रदेशातील प्रतिबंधकतेकडे मजबूत आणि शाश्वत लक्ष दिले पाहिजे.
