काय सांगता.. व्यायाम न करताच होईल महिन्याला तीन ते चार किलो वजन कमी; ‘फिस्ट डाइट’ फॉलो केल्याने होईल शक्य!

Weight Loss Diet: प्रत्येकजण लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु, अशात जर, कोणी सांगीतले की, व्यायाम न करताही महिन्याला दोन ते तीन किलो वजन कमी करता येते. तर आपला विश्वास बसणार नाही. हे खरे आहे. ‘फिस्ट डाएट’ मध्ये असे होऊ शकते. जाणून घ्या, काय आहे फिस्ट डाएट..

काय सांगता.. व्यायाम न करताच होईल महिन्याला तीन ते चार किलो वजन कमी; ‘फिस्ट डाइट’ फॉलो केल्याने होईल शक्य!
Fist DietImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 3:29 PM

वजन कमी करण्याचे सर्वात अचूक तत्त्व म्हणजे ‘कॅलरी इन विरुद्ध कॅलरीज आउट’. म्हणजेच तुम्ही किती कॅलरीज (How many calories) खात आहात आणि किती कॅलरीज बर्न करत आहात. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांना हे तत्व पाळावेच लागेल. जर तुम्ही मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा कमी खाल्ले तर तुमचे वजन कमी होते. वजन कमी करतांना सर्वात अधिक कंटाळा येत असेल तर तो व्यायाम करण्याचा.. वजन कमी करण्याची इच्छा तर असते, पण व्यायाम करावा लागेल या भितीनेच अनेकजण माघार घेतात. परंतु, जर व्यायाम न करताही (Even without exercise) तुम्हालाही तुमचे वजन कमी करता येत असेल तर असा डाएट प्लॅन प्रत्येकालाच फॉलो करायला आवडेल. वजन कमी करण्यासाठी अशाच एका आहाराचे नाव आहे फिस्ट डाएट (Fist diet). फिस्ट डाएट म्हणजे काय? हे कस काम करत? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

काय आहे फिस्ट डाएट

फिस्ट डाएट म्हणजेच, मूठभर आहार हा एक आहार आहे. ज्यामध्ये तुम्हाला मूठभर अन्न घ्यावे लागते. या आहारात तुम्हाला तीन वेळा आणि प्रत्येक जेवणात चार मुठभर अन्न खावे लागते. तुम्ही खाल्लेल्या अन्नामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी आणि फायबर यांचा समावेश असावा. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात दररोज तीन जेवणात चमचाभर चरबी म्हणजेच तूप किंवा तेल असले पाहिजे. या आहारामुळे प्रत्येक आठवड्यात सुमारे 400-900 ग्रॅम वजन कमी होऊ शकते. फिस्ट डाएटमध्ये ठराविक प्रमाणात कॅलरीज खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. विशेष म्हणजे हा डाएट फॉलो करतांना, व्यायाम करण्याची गरज नाही.

फिस्ट डाएटमध्ये या गोष्टी खाणे टाळा

फिस्ट डाएटमध्ये नेहमी संतुलित आहार घेतला जातो. समजा तुम्ही या आहारात मर्यादित कॅलरीजमध्ये काहीही खाऊ शकता, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही फास्ट फूड, चॉकलेट आणि मिठाई खाण्यास सुरुवात करावी. या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट आणि फायबर युक्त गोष्टी खाव्या लागतात. जेवणाचे तीन भाग करा आणि नंतरच सेवन करा. प्रोटीनसाठी मांस, मासे आणि अंडी खाऊ शकतात. भाज्या, पास्ता, तांदूळ, बटाटे, तृणधान्ये आणि ब्रेड कार्बोहायड्रेट म्हणून खाऊ शकतात. नट्स फॅट म्हणून खाऊ शकतात, पण जर तुम्हाला ड्रायफ्रुट्सची अॅलर्जी असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो, चीज आणि बटर खाऊ शकता.

हे सुद्धा वाचा

व्यायाम करणे आवश्यक नाही

फिस्ट डाएटमध्ये व्यायाम करणे आवश्यक नाही, परंतु तज्ज्ञ शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याची शिफारस करतात. जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुमचे वजन हळूहळू कमी होत जाईल, पण जर तुम्ही आहारासोबतच वेट ट्रेनिंग किंवा कार्डिओ करत असाल तर झपाट्याने वजन कमी होऊ शकते आणि महिन्याभरात तीन ते चार किलो वजनही कमी होऊ शकते. जर कोणी रोज 30 मिनिटे व्यायाम करत असेल तर त्याला लवकर परिणाम मिळतात.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.