कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेय? रुग्णालयात कोणी दाखल व्हावे, कोणी घरीच उपचार घ्यावेत?

| Updated on: Apr 22, 2021 | 4:49 PM

RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची घाई करु नका, असं आवाहन डॉक्टर करत आहेत ( Covid-19 patient hospital admission)

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेय? रुग्णालयात कोणी दाखल व्हावे, कोणी घरीच उपचार घ्यावेत?
oximeter
Follow us on

मुंबई : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यानंतर आवश्यकता नसतानाही अनेक जण हॉस्पिटल गाठण्यासाठी धावपळ करतात. कोरोनाबाधित रुग्णाला सौम्य लक्षणं असल्यास गृह विलगीकरणाचा (Home Quarantine) पर्यायही बरं होण्यासाठी सोयीस्कर ठरु शकतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची योग्य वेळ कोणती, हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. (When should a Covid-19 patient seek hospital admission)

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासत आहे. RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची घाई करु नका, असं आवाहन डॉक्टर करत आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी रुग्णालयात जागा ठेवा, विनाकारण बेड अडवू नका, असं आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. सौम्य लक्षण असलेले कोरोनाबाधित रुग्ण होम क्वारंटाईन राहूनही उपचार घेत बरे होऊ शकतात. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोरोनाग्रस्तांनी काय करावे?

पोषक आहाराव्यतिरिक्त कोरोनाग्रस्तांनी पाणी, ज्यूस यासारखे भरपूर द्रवपदार्थ, योग, प्राणायाम करावे. मन प्रसन्न ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. सोबतच कोविड पॉझिटिव्ह रूग्णांनी ताप आणि ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ऑक्सिजन पातळीच्या अचूक आकलनासाठी सहा मिनिट वॉक टेस्ट घेण्याविषयी सुचवण्यात आले आहे.

सहा मिनिट वॉक टेस्ट

रुग्णाने आपल्या आयसोलेशन कक्षात सहा मिनिटे चालण्यापूर्वी आणि चालल्यानंतर ऑक्सिजन रीडिंग घ्यावे. ही चाचणी एका दिवसात 2-3 वेळा घेतली जाऊ शकते, असे व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे. जर हे रीडिंग सामान्य असेल तर रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही. अर्थात कुठल्याच कोरोनाग्रस्त रुग्णाने आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नये आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रुग्णालयात कधी जावे?

बेसलाईन ऑक्सिजन सॅच्युरेशन 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल

सहा मिनिट वॉक टेस्ट आधी आणि नंतर यात चार टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घट असेल

एका बेडवर पालथे झोपा (पोट खाली आणि पाठ वर) यामुळे ऑक्सिजनच्या मात्रेत सुधारणा होईल

( Covid-19 patient hospital admission)

कोरोनाग्रस्त रुग्णांनी कोणते औषध घ्यावे?

जर ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल नॉर्मल असेल आणि तापाशिवाय कुठलाच त्रास नसेल, तर पॅरासिटामॉलशिवाय कुठल्याही औषधाची गरज नाही

संबंधित बातम्या :

6 Minutes Walk Test : टास्क फोर्सने कोरोना रुग्णासाठी सुचवलेली 6 मिनिटे वॉक टेस्ट नेमकी काय? 

कोरोनाचा सर्वाधिक धोका कुणाला? यादी जाहीर, तुमचं नाव तपासा!

तुमची फुफ्फुसं व्यवस्थित आहेत का? ‘6 मिनिट वॉक टेस्ट’ने घरच्या घरी तपासा!

( Covid-19 patient hospital admission)