AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्तनांमध्ये आढळलेली गाठ असू शकते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

चुकीची जीवनशैली, कौटुंबिक इतिहास, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी आणि लक्षणांची माहिती नसणे यामुळे महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

स्तनांमध्ये आढळलेली गाठ असू शकते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
| Updated on: Nov 23, 2022 | 11:05 AM
Share

नवी दिल्ली – देशभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) केसेस (breast cancer) झपाट्याने वाढत आहेत. आता लहान वयातील महिलाही या (woman in young age) गंभीर आजाराला बळी पडत आहेत. गेल्या सुमारे 10 वर्षांमध्ये तरूण महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याच्या अधिक केसेस समोर आल्या आहेत. यापूर्वी वयाच्या 40 व्या वर्षानंतर (after 40 years) कॅन्सरची प्रकरणे समोर येत होती, मात्र आता असे नाही. हे चित्र लक्षणीयरित्या बदलले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे वाढणे आणि कमी वयातच हा आजार होणे यामागचे कारण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. चुकीची जीवनशैली, कौटुंबिक इतिहास, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी आणि लक्षणांची माहिती (less knowledge about the disease) नसणे यामुळे महिलांमध्ये या गंभीर आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, देशात दर आठपैकी एक महिला ही ब्रेस्ट कॅन्सरने पीडित आहे. आजकाल महिला उशीरा लग्न करतात. वय बरंच वाढल्यानंतर लग्न करणे, मुलांचा जन्मही उशीरा होणे, त्यांना स्तनपानही न देणे, या कारणांमुळेही ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. स्तनांमध्ये गाठ आढळून येणे, स्तनाग्रांमधून स्त्राव येणे, स्तन आतल्या बाजूस ओढले गेल्यासारखे वाटणे, अचानक लक्षणीय वेगाने वजन कमी होणे ही ब्रेस्ट कॅन्सरची प्रमुख लक्षणे असतात. अशा परिस्थितीत स्तनामध्ये गाठ आढळून आल्यास त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नये आणि त्वरित डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा.

स्तनामध्ये असलेली गाठ हे ब्रेस्ट कॅन्सरचेच लक्षण असते का ?

राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमधील ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. राजीव कुमार यांच्या सांगण्यानुसार, स्तनामध्ये होणारी अथवा असणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. केवळ 30 ते 40 टक्के गाठी या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात. एखाद्या गाठीमध्ये कॅन्सर वाढत असला तरी त्यावर उपचारही करता येतात, मात्र त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. असे दिसून आले आहे की कॅन्सरची 5 टक्के प्रकरणे ही अनुवांशिक देखील आहेत. म्हणजेच ज्या कुटुंबांमध्ये एखाद्या व्यक्तील पूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल, तेथेही तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो, असे डॉ. राजीव यांनी सांगितले. ज्यांच्या कुटुंबात असा इतिहास असेल अशा महिलांनी नियमितपणे कॅन्सरची तपासणी करून घ्यावी.

बीआरसीए जीन टेस्टिंगची घ्यावी मदत

ज्यांच्या कुटुंबात यापूर्वी कॅन्सरचा इतिहास असेल, ते हाय रिस्क मानले जातात. त्यांनी वेळोवेळी कॅन्सरची तपासणी करून घ्यावी, त्यासाठी बीआरसीए जीन टेस्टिंगची (जनुक चाचणी) मदत घेता येऊ शकते. वयाच्या 20 वया वर्षानंतरच ही चाचणी करता येऊ शकते. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी आता नव्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे. आता ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये मृत्यूचा धोका खूप कमी झाला आहे, असे डॉ राजीव यांनी नमूद केले.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय...
Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा...
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदत वाढ
देवेंद्र फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर
कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून...
MPSC Paper Leak :कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट
जत तालुक्यात पाणीटंचाई आणि इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको...
जत तालुक्यात पाणीटंचाई आणि इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन
सुप्रिया सुळेंची खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक,
सुप्रिया सुळेंची NCP खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक, नेमकं कारण काय?
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO