
तुम्ही कधी विचार केला आहे की पोहण्याच्या पाण्यात वा आंघोळीच्या पाण्यातील एका सुक्ष्म जीवामुळे आपला जीव जाऊ शकतो ? ऐकायला मोठे विचित्र वाटेल की एका अमिबामुळे मृत्यू कसा येऊ शकतो. केरळात घडलेल्या एका चिमुरडीच्या मृत्यूने हा मेंदू पोखणारा अमिबा चर्चेत आला आहे. या घटनेने अनेकांच्या जीवाचा थरकाप उडाला आहे. केरळातील या मुलीचा मृत्यू मेंदू खाणाऱ्या अमिबाने झाला आहे.(Brain-Eating Amoeba) म्हणजे निगलेरिया फाऊलेरी (Naegleria fowleri) असे हा अमिबाचे शास्रीय नाव आहे.
गेल्या अनेक वर्षांत केरळात मेंदू खाणाऱ्या अमिबाने अनेक मृत्यू झाले आहेत. हा अमिबा आपण शालेय अभ्यासक्रमात शिकलेलो आहे.हा सर्वसामान्य अमिबा नाही. मायक्रोस्कोपने आपण याला पाहू शकता. हा बहुतांशी कोमट, किंवा साचलेल्या कमी अस्वच्छ पाण्यात पैदा होतो. खास करुन तलाव, सरोवर, स्वीमिंग पुल किंवा स्वच्छ न केलेल्या पाण्यात हा सुक्ष्म जीव वेगाने वाढत असतो.
दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागातील डॉ.सुभाष गिरी यांनी सांगितले ब्रेन इटिंग अमिबाला निगलेरिया फाऊलेरी म्हटले जाते. हा एक दुर्मिळ खपूच जास्त इन्फेक्शन फैलावणारा जीव आहे. हा नाकाद्वारे मेंदूत पोहचतो. येथूनच याचा खतरनाक संसर्ग सुरु होतो.
सुरुवातीला हा अमिबा नाकाच्या नसांच्यावर चढतो. आणि ब्रेन ( मेंदू ) पर्यंत पोहचतो. तेथे मेंदूच्या पेशींना नष्ट करतो. जेव्हा अस्वच्छ पाणी नाकात जाते तेव्हा हे इन्फेक्शन सुरु होते. खासकरुन स्विमींग पुल, डबके, किंवा तलावाच्या घाण पाण्यात हा अमिबा असतो.
या आजाराची समस्या ही आहे की सुरुवातीची लक्षणं एकदम सर्वसामान्य असतात, जसे व्हायरल ताप आल्यावर येतात तशी. त्यामुळे लोक याकडे दुर्लक्ष करतात. परंतू जसजसा आजार वाढत जातो, तसेच रुग्णाला फिट्स येतात. रुग्ण बेशुध्द पडू शकतो आणि परिस्थिती आणखी बिकट होते. यामुळे रुग्णाला तीव्र डोकेदुखी, ताप, उल्टी, मान अखडणे आदी लक्षणे दिसतात.
या आजाराचे मेडिकल नाव प्रायमरी अमिबिक मेनिंजोएन्सेफलाइटिस (PAM) आहे. दुर्देवाने याचा उपचार अवघड आहे. आणि आतापर्यंत जेवढी प्रकरणे आली आहेत, त्यात मृत्यू दर जास्त आहेत. कारण मेंदूत गेल्यानंतर हा अमिबा वेगाने पसरतो. त्यामुळे औषधे त्या वेगाने काम करु शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांकडे वेळ खुपच कमी असतो.
जर तुम्ही नदी, तलाव आणि सरोवरात पोहत किंवा आंघोळ करत असाल तर नेहमी सावध राहा
नाकात पाणी जाऊ नये याची काळजी घ्या
स्वच्छता असलेल्या आणि क्लोरीन केल्या स्विमिंग पुलाचा वापर करा
नाकात पाणी गेल्यानंतर त्वरीत काळजी घ्या, लगेच स्वच्छ करा
घाणेरडे तलाव, क्लोरिनेशन न केले स्विमींग पूल टाळा
स्वच्छ पाणी पित जा, स्वच्छता पाळा