काही लोक एका पेगमध्येच टल्ली का होतात? हैराण करणारं कारण आलं समोर
काही लोक एकाच पेगमध्ये लगेच टल्ली होतात, तर काही जणांवर दारूचा परिणाम हळू होतो. याचे कारण शरीराचे वजन, वय, रिकामे पोट, पिण्याचा वेग आणि शरीराची दारू पचवण्याची क्षमता यावर अवलंबून असते. दारूचा परिणाम प्रत्येकावर सारखा नसतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

तुम्ही अनेकांना दारू पिताना पाहिलं असेल. त्यातील काही लोक दारू पिण्यासाठी उतावीळ होतात. पण जेव्हा प्यायला बसतात, तेव्हा एका पेगमध्येच टल्ली होतात. तर काही लोक एक पेग घेतल्यानंतरही नॉर्मल असतात. तज्ज्ञांच्या मते, शरीराचं वजन, वय, लिंग, रिकाम्यापोटी दारू पिणं, पिण्याचा वेग आणि शरीराची अल्कहोल सहन करण्याची क्षमता या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत असतात. आणि विशेष म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झालं आहे.
काही लोकांना थोडी दारू प्यायल्यानंतर लगेच चढते. तर काही लोक तेवढ्याच प्रमाणात दारू पिऊनही सामान्य दिसतात. असं का होतं? याचासंबंध शारीरिक क्षमतेशी आहे की या मागे काही वैज्ञानिक कारण आहे? तज्ज्ञांच्या मते, दारूचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर एक सारखा होत नाही.
शरीराच्या वजनाचा परिणाम
शरीरात दारू गेल्यावर ती रक्ताच्या माध्यमाधून शरीराच्या वेगवेगळ्या भागात जाते. ज्या लोकांच्या शरीरात अपेक्षेप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी असतं, त्यांच्यात समान मात्रेतील दारूचे रक्तात concentration अधिक होण्याची शक्यता असते. म्हणूनच समप्रमाणात दारू पिऊनही दोन वेगवेगळ्या लोकांमध्ये नशेची तीव्रता कमी अधिक असते. शरीराचं वजनही नशा वाढीस कारणीभूत असतं. सामान्यपणे कमी वजन असणाऱ्या लोकांनी तेवढीच दारू प्यायल्यावर त्यांच्यावर दारूचा परिणाम अधिक वेगाने होतो. मात्र, वजन पाहून कोणत्या व्यक्तीवर दारूचा किती परिणाम होऊ शकतो हे शरीर पाहून सांगता येत नाही.
रिकाम्या पोटी प्यायल्याने नशा
एखादी व्यक्ती रिकाम्या पोटी दारू पीत असेल तर दारू वेगाने absorb होऊ शकते. तर जेवण, खासकरून प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असलेलं जेवण पोटातील छोट्या आतड्यांमध्ये दारू जाण्याच्या गतीला प्रभावित करू शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी दारू प्यायल्यावर काही लोकांना कमी वेळात नशा जाणवू लागते.
तज्ज्ञांच्या मते, दारूची नशा ही व्यक्तीचं वय, शरीराचा आकार, जेवणाची स्थिती, दारू पिण्याची गती आणि शरीरातील alcohol metabolismच्या क्षमतेवर अवलंबून असते. रिकाम्या पोटी कमीत कमी प्रमाणात दारू घेतल्यावर blood alcohol concentration वेगाने वाढते. त्यामुळे व्यक्तीला नशा लवकर चढते. पण अधिक दारू पिणाऱ्या व्यक्तीचं शरीर सुरक्षित राहतं हा गैरसमज आहे. अनेकदा tolerance वाढल्याने व्यक्तीला कमी नशा चढलेली दिसून येते. पण शरीरावर तरीही प्रभाव पडलेला असतोच. त्यामुळे त्या व्यक्तीच्या सहनशीलतेमुळे त्याची दारू पचवण्याची क्षमता चांगली आहे आणि त्यामुळे त्याचं शरीर उत्तम राहतं असं समजू नये.
( वैधानिक इशारा : मद्यपान आरोग्यास हानिकारक असून त्याचे सेवन शरीरावर गंभीर परिणाम करू शकते. आरोग्यविषयक समस्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)