स्त्रियांनो, लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारावरील उपचारांविषयी जाणून घ्या

| Updated on: Feb 14, 2022 | 1:59 AM

स्त्रियांच्या शरीरामध्ये अति लठ्ठपणा झाल्यावर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशावेळी जर आपण योग्य उपचार पद्धती वापरली तर त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात अन्यथा वेगवेगळे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात.

स्त्रियांनो, लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारावरील उपचारांविषयी जाणून घ्या
स्त्रियांनो, लठ्ठपणामुळे त्रस्त आहात?
Follow us on

मुंबई : अति लठ्ठपणा (over weight) ही समस्या दिवसेंदिवस महिलांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. भारत हा अतिलठ्ठपणा या समस्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर देश आहे. त्याचबरोबर बहुतेक वेळा बदललेली आहार पद्धती, बदललेली जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे शरीरावर विपरीत परिणाम पाहायला मिळतात. अति लठ्ठपणाची समस्या (obesity problems) सध्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना पाहायला मिळत आहे परंतु ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक तर दिसून येत आहे. अनेक स्त्रिया व मुली या समस्येपासून त्रस्त असतात. या समस्यांवर घरच्या घरी अनेक उपाय करत असतात परंतु उपाय योजना करून सुद्धा आपल्याला हवा तितका फरक काही जाणवत नाही म्हणूनच अनेकदा अति लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे. अति लठ्ठपणा निर्माण होण्यामागील नेमके कारण काय असते, हे सुद्धा अनेकांना माहिती नसते म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपल्याला डॉ. अश्विनी गायकवाड अति लठ्ठपणा बद्दल काही महत्वाची माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी आपण डॉ. अश्विनी यांच्याबद्दल जाणून घेऊया. डॉ अश्विनी ह्या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. गेल्या 18 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत आहेत. भारतातील पहिल्या महिला ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून डॉ.अश्विनी यांची जगभरात ख्याती आहे. सेवी अवॉर्ड मिळवणाऱ्या या पहिल्या होमिओपॅथी डॉक्टर आहेत. अतिलठ्ठपणावर आधारित अनेक समस्या यावर डॉक्टर यांनी संशोधन करून निराकरण (reserch based solution) केलेले आहे. टिव्ही 9 मराठीशी बातचीत करताना त्यांनी ही माहिती सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊया अतिलठ्ठपणा याबद्दल महत्वाची माहिती… (Women, are suffering from obesity? How to follow about treatments for obesity)

अतिलठ्ठपणाची कारणे

आनुवंशिकता
अनियमित आहार पद्धती
डिलिव्हरी नंतर वजन वाढणे
एखादी ट्रीटमेंट चालू असणे
हार्मोनल असंतुलन
टाईप 2 डायबिटीस
हाय कॉलेस्ट्रॉल

अतिलठ्ठपणामुळे होणारे आजार

हाय ब्लड प्रेशर
डायबिटीज
मणक्यामध्ये गॅप येणे, गुडघ्यात गॅप येणे
हाडांचे विविध आजार होणे
हार्ट अटॅक
पॅरालीसीस वेरिगोव्हेन्स
इन फर्टीलिटी (वंध्यत्व),
पिसीओडी , पीसीओएस
त्वचेत फंगल इन्फेक्शन,
स्ट्रेच मार्क दिसणे

अति लठ्ठपणावर उपचार पद्धती

अति लठ्ठपणावर गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारे कनकवेदामध्ये उपचार पद्धती करण्यात येत आहेत. या उपचार पद्धतीत रुग्णाला कोणत्याही प्रकारचे वजन कमी करणे, आहार नियंत्रण, क्रॅश डायट, जिम, योगा करण्यास सांगितलं जातं नाही. अशावेळी रुग्णांना फक्त दिलेली औषधे व्यवस्थितरित्या सेवन करायची असतात आणि आपला आहार सांगितल्याप्रमाणे सेवन करायचे असते. वजन कमी करण्यासाठी प्रामुख्याने होलेस्टिक औषधे वापरली जातात. ही सगळी औषधी वनस्पतीपासून बनवली गेली असल्याने या औषधांचा रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. (Women, are suffering from obesity? How to follow about treatments for obesity)

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या

ऐन तारुण्यात केस गळू लागले? अकाली टक्कल पडणं म्हणजे नेमकं काय? कशामुळे होतं असं?

Health Care : वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये या खास 5 पदार्थांचा समावेश करा!