योगा करण्याचा विचार करत आहात…पण कळतं नाही कुठले योगाचे प्रकार कराचे…मग जाणून घ्या एका क्लिकवर कुठला योगा तुमचासाठी आहे बेस्ट

योगा करण्याचा विचार करत आहात...पण कळतं नाही कुठले योगाचे प्रकार कराचे...मग जाणून घ्या एका क्लिकवर कुठला योगा तुमचासाठी आहे बेस्ट
फाईल फोटो

निरोगी राहण्यासाठी आज व्यायामाची गरज आहे. खास करुन महिलांना त्यांना घर आणि नोकरी अशा दोन्ही भूमिका आज सांभाळायचा असतात. अशावेळी निरोगी आरोग्य खूप गरजेचं आहे. महिलांना जिम जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशामध्ये तुम्ही घरीच निरोगी राहण्यासाठी योगा करु शकता. आज आम्ही तुम्हाला कुठले योगाचे प्रकार करुन निरोगी राहू शकता ते सांगणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 19, 2022 | 7:32 PM

योगामुळे आपण निरोगी राहतो तसंच सुंदरही दिसतो. दैनंदिन जीवना आपण खूप धावपळ करतो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. विशेष करुन महिलांना घर आणि नोकरी असा दोन्हीचा गाढा हाकायचा असतो. त्यात तिला अनेक मानसिक आणि शारीरिक त्रासालाही समोर जावं लागते. त्यामुळे अशामध्ये महिलांनी रोज थोडा वेळ काढून योगा केल्यास त्यांना नक्की याचा फायदा होतो. योगाचे हे पाच प्रकार करा आणि निरोग राहा. 1 चक्रवाकासन – हा योगा प्रकार करण्यासाठी आपले मनगट आणि गुडघे खांद्याच्या खाली जमिनीवर घट्ट ठेवा. त्यानंतर पायाची बोटं आतल्या बाजूला घ्या. मग हळूहळू तुमची पाठ जमिनीच्या दिशेने टेकवा. श्वास सोडत सोडत तुमचा पाठीचा कणा वाकवा आणि हनुवटी छातीपर्यंत आण्याचा प्रयत्न करा. हा प्रकार पुन्हा पुन्हा करा.

2. अधोमुख श्वासन हे आसन करताना सुरुवातीला हात आणि पाय जमिनीवर ठेवा. ही तुमची शरीराची स्थिती एका टेबलसारखी दिसायला हवी. आता हळूहळू आपले नितंब वरच्या दिशेने उचला. श्वास घेत घेत हे करा. त्यानंतर आपले कोपर आणि गुडघे सरळ करुन उलटा व्ही आकार बनेल असं करा. आता तुमचे हात जमिनीवर दाबा आणि मान सरळ करा. तुमचे हात असे ठेवा की ते कानाला स्पर्श झाले पाहिजे. आणि आता श्वास घेत एकाग्रतेने डोळे नाभीकडे केंद्रीत करा. काय वेळ या स्थित राहा आणि पुन्हा टेबल स्थितीमध्ये परत या. 3. सेतू बंधनासन – या आसनात प्रथम पाठीवर झोपा आणि गुडघे वाकवा. त्यानंतर हात बाजूला ठेवा. आणि आता श्वास घेत घेत तुमचे पाय जमिनीवर घट्ट दाबून धरा. आता हळू हळू तुमचे हिप्स वर उचलला. आता हात आणि खांदे जमिनीवर दाबून ठेवा आणि छाती वर उचलला. काही वेळासाठी या स्थित राहा.

4. बालासन – घुटनेच्या आधारे खाली बसा. मग आपल्या शरीराचा भार मांडीवर टाका. श्वास सोडत तुम्ही खालच्या बाजूला जा. तुमचे हात समोरच्या दिशेने पुढे न्या. डोके जमिनीला टेकवा. या स्थितीत जरा वेळ थांबा आणि पुन्हा मूळ स्थित या.

5. अर्ध उत्तानासन – या आसनासाठी योगा मॅटवर ताडासनाच्या मुद्रेत उभे राहा. आता हळू हळू पुढे वाकून गुडघे सरळ ठेवा. हे आसन करताना हात सरळ राहतील याची काळजी घ्या.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें