AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

35 वर्षांनंतर महिलांनी या चाचण्या नक्की कराव्यात कारण…., पाहा संपूर्ण यादी

वयाच्या 35 व्या वर्षानंतर, महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. जे हळूहळू गंभीर आजारांचे रूप धारण करू शकतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण महत्त्वाचं आहे.

35 वर्षांनंतर महिलांनी या चाचण्या नक्की कराव्यात कारण...., पाहा संपूर्ण यादी
फाईल फोटो
| Updated on: Aug 21, 2025 | 2:27 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यावर दुर्लक्ष होतं आणि काही वर्षांनी त्याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी स्वतःच्या  आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. कामाचा तणाव, ऑफिस, घर अनेक जबाबदाऱ्यांमध्ये महिला अडकलेल्या असतात. त्यामुळे महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत. सांगायचं झालं तर, 35 वर्षांनंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल, मेटाबॉलिक आणि शारीरिक बदल होऊ लागतात. परंतु कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे महिला या बदलांकडे दुर्लक्ष करतात. कधीकधी कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे त्या वेळ काढू शकत नाहीत तर कधीकधी घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्या त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. पण महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे.

35 वर्षांनंतर महिलांना उच्च रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. यासाठी दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. लिपिड प्रोफाइल कोलेस्ट्रॉल चाचणी: ही चाचणी शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी मोजते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका किती आहे याचा अंदाज लावता येतो.

थायरॉईड फंक्शन टेस्ट (TSH, T3, T4), महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या खूप सामान्य आहेत. थकवा, वजन वाढणे किंवा कमी होणे, मूड स्विंग्स ही सर्व थायरॉईड असंतुलनाची लक्षणे असू शकतात. वर्षातून एकदा थायरॉईड टेस्ट करावी.

संपूर्ण रक्त गणना (CBC) अशक्तपणा किंवा संसर्ग शोधते. यासोबतच, 35 वर्षांनंतर व्हिटॅमिन डी आणि बी 12 ची कमतरता सामान्य होते. यामुळे हाडांमध्ये वेदना, थकवा आणि मानसिक थकवा येतो.

पॅप स्मीअर आणि एचपीव्ही चाचणी ही चाचणी दर 3 वर्षांनी एकदा करावी, यामुळे गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची सुरुवात ओळखण्यास मदत होते. एचपीव्ही विषाणू चाचणी याच्याशी संबंधित आहे, जी कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे.

मॅमोग्राफी किंवा स्तन तपासणी जर तुमच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सर कोणाला असले, तर 35 वर्षांनंतर, तुम्ही वर्षातून एकदा स्तन तपासणी आणि मॅमोग्राफी करावी. जर सुरुवातीच्या चाचणीत लक्षात आलं तर त्यावर उपचार करणं सोपं होतं.

टीप: येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट