रवीना टंडनचा पहिला हिरो आहे 2900 कोटींचा मालक, आजही अविवाहित, कोण आहे ‘तो’?
Raveena Tandon First Hero: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन आजही बॉलीवूडमध्ये सक्रियआहे आणि ती तिच्या कुटुंबासह आनंदी जीवन जगत आहे. पण, रवीनाचा पहिला हिरो अजूनही अविवाहित आहे. जो तब्बल 2900 कोटींचा मालक आहे .

Raveena Tandon First Hero: हिंदी सिनेविश्वात स्वतःची खास ओखळ निर्माण करणारी अभिनेत्री रवीना टंडन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रवीना हिने 1991 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 90 च्या दशकात फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील अभिनेत्रीने राज्य केलं… पण आता रवीना पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही… पण रवीनाचा पहिला हिरो आजही मोठ्या पडद्यावर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
रवीना टंडन हिच्या पहिल्या अभिनेत्याबद्दल अनेक रंजक गोष्टी आहे… त्याने वयाच्या 59 व्या वर्षी देखील लग्न केलेलं नाही.. अद्यापही तो एकटाच फिरत आहे… तर अभिनेता तब्बल 2900 कोटी रुपयांचा मालक आहे… संपत्तीच्या बाबतीत, तो अक्षय कुमार आणि आमिर खान सारख्या सुपरस्टार्सपेक्षा खूप पुढे आहे. आज रवीनाच्या पहिल्या हिरोबद्दल जाणून घेऊया?
रवीना टंडन हिने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पत्थर के फूल’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात रवीना हिच्यासोबत अभिनेता सलमान खान याने मुख्य भूमिका साकारली. सलमानने 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या सिनेमातून अभिनेत्री भाग्यश्रीसोबत मुख्य अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. रवीनाच्या कारकिर्दीची सुरुवात सलमानसोबत झाली.
सर्वात श्रीमंत अभिनेता आहे सलमान खान
सलमान खानने त्याच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचे फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील लाखो चाहते आहेत. संपत्तीच्या बाबतीतही सलमान खूप पुढे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्याची एकूण संपत्ती 2900 कोटी रुपये आहे. सलमान अनेक सुपरस्टार्सपेक्षा श्रीमंत आहे. बॉलिवूडमध्ये फक्त शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशनसारखे सुपरस्टार सलमान याच्या पुढे आहेत.
वयाच्या 59 व्या वर्षी देखील अविवाहित आहे सलमान खान…
सलमानचा जन्म 29 डिसेंबर 1965 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला. या वर्षाच्या अखेरीस सलमान 60 वर्षांचा होईल. पण, अभिनेत्याने अद्याप लग्न केलेलं नाही. त्याचे अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते. पण, त्यापैकी कोणतंही नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमानने सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ सारख्या अभिनेत्रींना डेट केलं आहे.
