AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतंत्र ओळखीच्या दिशेने एक धाडसी पाऊल, अनाया बांगड हिच्यावर यशस्वी जेंडर-अफर्मिंग सर्जरी

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कोच असलेले संजय बांगड यांची कन्या अनाया बांगड हिच्यावर अखेर थायलंड येथे जेंडर-अफर्मिंग सर्जरी यशस्वी झाली आहे.

स्वतंत्र ओळखीच्या दिशेने एक धाडसी पाऊल, अनाया बांगड हिच्यावर यशस्वी जेंडर-अफर्मिंग सर्जरी
Anaya Bangad
| Updated on: Mar 15, 2026 | 10:51 PM
Share

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कोच संजय बांगड यांची मुलगी अनाया बांगड हिच्यावर जेंडर-अफर्मिंग सर्जरी यशस्वी झाली आहे.अनायाने सोशल मीडियावर सांगितले की सर्जरी यशस्वी झाली आणि सध्या ती रिकव्हरीच्या स्टेजमधून जात आहे.अनाया बऱ्याच काळापासून या सर्जरीची वाट पाहात होती आणि मार्चमध्ये थायलंडमध्ये सर्जरी करणार होती. आता तिने पोस्ट करुन तिच्यावरील लिंग बदलाच्या सर्जरीच्या यशाची माहिती दिली आहे.

अनाया हीची सोशल मीडिया पोस्ट

अनाया हिने सोशल मीडिया पोस्टवर लिहीलेय की सर्जरी यशस्वी झाली, थोडे दुखत आहे. आता हळूहळू रिकव्हरी होत आहे. हळूहळू आता पुढे जात आहे. डॉ.चेट आणि WIH इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या टीमने घेतलेल्या काळजीबद्दल आपण त्यांचे आभार मानत आहोत. एक लांबचा प्रवास होता. आणि हा दिवस या प्रवासाचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला. तुमच्या सर्वांचे प्रेम, समर्थन आणि संदेशासाछी धन्यवाद हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.

पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रवास पूर्ण

अनाया हिने आधी सांगितले होते की हा निर्णय काही अचानक घेतलेला नाही. तिने जवळजवळ पाच वर्षे या क्षणाची वाट पाहिली होती आणि थेरपी, वैद्यकीय तपासणी आणि आत्मनिश्चयानंतर लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. अनायाने म्हटले होते की ती जन्मतःच ज्या लिंगाने जन्माला आली होती त्याच्याशी ती कधीही एकरुप होऊ शकली नाही. म्हणूनच, ही शस्त्रक्रिया तिच्या स्वतःच्या व्यक्तीमत्वाच्या ओळखीच्या प्रवासात एक महत्त्वाची पायरी आहे.

येथे पोस्ट पाहा –

View this post on Instagram

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

कुटुंबाचा पाठिंबा सर्वात मोठी ताकद

अनायाच्या प्रवासात तिच्या कुटुंबाने दिलेली साथ महत्त्वाची राहिली आहे. तिचा धाकटा भाऊ अथर्व बांगर हा सुरुवातीपासूनच तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, तर कालांतराने तिच्या पालकांनीही तिला पूर्णपणे स्वीकारले. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च तिचे वडील संजय बांगर यांनी उचलला आहे. हा क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक आधार आहे असे तिने म्हटले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल