Health care tips | निरोगी जीवन जगण्यासाठी महिलांनी या सोप्या टिप्स फॉलो नक्कीच कराव्यात…

| Updated on: Aug 06, 2022 | 6:25 AM

चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला खूप थकवा आणि चिडचिड वाटते. अशा परिस्थितीत दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप घ्या. झोपण्याच्या वेळेची नियमित दिनचर्या राखणे महत्वाचे आहे.

Health care tips | निरोगी जीवन जगण्यासाठी महिलांनी या सोप्या टिप्स फॉलो नक्कीच कराव्यात...
Follow us on

मुंबई : आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या (woman) आयुष्यातील सर्वात आनंदाची भावना असते. परंतु आजकाल खराब जीवनशैली, अस्वस्थ आहार, वाईट सवयी इत्यादींमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येत आहे. महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे महिला वंध्यत्वाच्या बळी ठरत आहेत. एका संशोधनानुसार (Research), तणावामुळे महिलांमध्ये वंध्यत्व देखील येऊ शकते, असे म्हटले आहे. खरं तर, अमेरिकेत (America) केलेल्या एका अभ्यासानुसार, जास्त ताणतणाव महिलांमध्ये वंध्यत्व निर्माण करू होते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कमी पातळीचा तणाव असलेल्या महिलांच्या तुलनेत दर महिन्याला जास्त तणाव असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेची 29 टक्के शक्यता असते.

जास्त तणावामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होते. यामुळे स्त्रीला गर्भधारणा न होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चुकीच्या खाण्याच्या सवयींमध्ये धूम्रपान, मद्यपान याशिवाय धकाधकीच्या नोकऱ्या, वैवाहिक कलह यांसारख्या गोष्टींमुळे जास्त ताण येतो. अशा परिस्थितीत निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही वंध्यत्वाच्या समस्येपासूनही सुटका मिळवू शकता.

हे सुद्धा वाचा

झोप

चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला खूप थकवा आणि चिडचिड वाटते. अशा परिस्थितीत दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप घ्या. झोपण्याच्या वेळेची नियमित दिनचर्या राखणे महत्वाचे आहे.

झोपेच्या वेळेपूर्वी हे नक्की करा

झोपायच्या आधी किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असता तेव्हा ईमेल वाचणे किंवा कॉल करणे टाळा. जोडीदारासोबत वेळ घालवा. यामुळे तुम्हाला खूप आराम वाटेल, तसेच झोपण्याच्या अगोदर मोबाईल आणि लॅपटाॅप दूर ठेवा.

निरोगी आहार

निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, फळे इत्यादींचा समावेश करू शकता.

लॅपटॉप, संगणक आणि फोनचा वापर मर्यादित करा

लॅपटॉप, संगणक आणि फोन यासारख्या गोष्टींचा मर्यादित वापर करा. विशेषत: रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरणे टाळा. लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि फोनमधून निघणारे किरण तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो.