World Birth Defects Day: जन्मजात विकार असल्यामुळे जगातील लाखो नवजात बालकांचा मृत्यू होतो, त्यावर हे आहेत उपाय

| Updated on: Mar 03, 2022 | 5:13 PM

डॉक्टरांच्या मतानुसार जन्मजात विकारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी गरज आहे ती गर्भावस्थेत असणाऱ्या मातांनी आपली स्वतःची काळजी घेण्याची. त्यांच्या सर्व तपासण्या करुन घेण्याची, गर्भवस्थेच्या काळात महिलांना खरी गरज असते ती त्यांच्या समुपदेशनाची. त्या काळातच त्यांच्याकडून जाणून घेतले पाहिजे की, त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही समस्या तर नाही ना.?

World Birth Defects Day: जन्मजात विकार असल्यामुळे जगातील लाखो नवजात बालकांचा मृत्यू होतो, त्यावर हे आहेत उपाय
baby health
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः जन्मजात दोष आणि विकार (congenital defect) असल्यामुळे जगभरातील लाखो नवजात बालकांचा मृत्यू होतो. या विकारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक जन्म दोष दिन (World Birth Defects Day) साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2019 मध्ये जगभरात 5.3 लाख मुलांचा जन्मजात आजारांमुळे मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या मतानुसार जन्मजात विकारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी गरज आहे ती गर्भावस्थेत असणाऱ्या मातांनी आपली स्वतःची काळजी घेण्याची, त्यांच्या सर्व तपासणी करुन घेण्याची. गर्भवस्थेच्या काळात महिलांना खरी गरज असते ती त्यांच्या समुपदेशनाची. त्या काळातच त्यांच्याकडून जाणून घेतले पाहिजे की, त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही समस्या तर नाही

जन्मजात दोष असूनही जी मुलं जिवंत आहेत त्यांनाही आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या शारीरिक किंवा मानसिक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. संशोधन आणि वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे जन्मजात विकारांच्या घटनांमध्ये घट झाली आहे मात्र ही समस्या आटोक्यात आली आहे असे कधीही म्हणता येणार नाही.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, जन्मजात विकारांची बहुतांश प्रकरणे मेंदू, हृदय आणि थॅलेसेमिया यासंबंधित आहेत. 2017 मध्ये 5 वर्षांखालील 82 हजार 436 हजार मुलांचा जन्मजात दोषांमुळे मृत्यू झाला होता. यावर्षी 5 लाख 1 हजार 764 नवजात बालके या आजारांना बळी पडली आहेत. या समस्यांचे प्रमाण कमी असले तरी ते पूर्णतः कमी झाले नाही म्हणूनच लहान मुलांमध्ये हे विकार का होतात, त्याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शारीरिक किंवा मानसिक विकार

मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनिला गर्ग म्हणतात की, एखाद्या महिलेला गर्भधारणेवेळी संसर्ग झाला तर जन्मला येणाऱ्या बाळाला शारीरिक किंवा मानसिक विकार होऊ शकतात. यामध्ये मेंदू, न्यूरल ट्यूब डिफेक्ट, थॅलेसेमिया, हृदयाचा आकार कमी असणे, डाऊन सिंड्रोम. चेहरा किंवा ओठ गळणे यासारखे गंभीर आजार यामध्ये आहेत. काही काही वेळा मुलांना बहिरेपणाही येतो, त्याचाही त्रास त्याला संभवतो.

ज्या महिला रुबेलाच्या बळी ठरतात…

डॉक्टरांच्या मते मुलांमध्ये या आजारांचे कारण अनुवांशिक असू शकते. त्याचबरोबर स्त्रीमध्ये तिच्या शरीराला उपयुक्त असणारे पोषण जर तिला मिळू शकले नाही तर ही समस्या उद्धभवू शकते. गर्भधारणेनंतर आई जर काही तणावामध्ये असेल आणि तिला काही वेदना होत असतील तर तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदूलाही हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याला मेंदूशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात ज्या महिला रुबेलाच्या बळी ठरतात, त्यांच्या मुलांना जन्मजात विकार होण्याची शक्यता जास्त असते.

समुपदेशन होणे गरजेचे

जन्मजात विकारांपासून बाळाला जर वाचवायचे असेल तर गर्भधारणेच्या वेळी महिलांच्या सर्व चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यांच्या या काळातच त्यांचे समुपदेश होणे गरजेचे असते. यावेळी जाणीवपूर्वक गर्भवस्थेत असणाऱ्या महिलेला काही आजार आहे का किंवा काही गंभीर समस्या आहे का याची तपासणी करणे गरजेचे असते. या काळात योग्य प्रकारच्या तपासण्या झाल्या केल्या असतील आणि त्यामध्ये बाळासंदर्भात काही दोष आढळल्यास त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज असल्याची माहिती डॉ. सुनीला यांनी सांगितली आहे.

रुबेलाची लस घेणे गरजेची

बाळाचे जन्मजात दोष कमी करायचे असतील तर गर्भवस्थेतील महिलांना रुबेलाची लस घेणे गरजेची आहे. जन्मजात दोषापासून वाचवायचे असेल तर बाळाला सगळ्यात आधी गर्भवती महिलेची काळजी घेणे. या काळात महिलांनी गरज नसताना कोणतेही औषध घेता कामा नये. दारु आणि सिगरेटपासून महिलांनी लांब राहिले पाहिजे. सकस आहार, फळे, ताज्या भाज्या, भरपूर व्हिटॅमिन असणाऱ्या पदार्थ खाल्ले पाहिजे. गर्भवस्थेच्या खरी गरज असते डॉक्टरांच्या सल्ल्याची, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य चाचण्या वेळेवर केल्या गेल्या पाहिजे. गर्भवस्थेती चांगले राहण्यासाठी स्वच्छ वातावरणात आणि दूषित हवामानापासून लांब राहा.

प्रसुती रुग्णालयात न होता घरी होते

भारतातील अनेक महिलांची प्रसुती ही रुग्णालयात न होता, ती घरी होते. त्यामुळे बाळ जन्मल्यानंतर तात्काळ त्याच्या तपासण्या करणे, त्याला काही त्रास आहे, त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या करणे गरजेचे असते. यासाठी गर्भवस्थेत असणाऱ्या महिलेची प्रसूती रुग्णालयातच कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रुग्णालयात जर प्रसूती झाली तर जन्माच्या वेळी बाळाला कोणताही आजार असल्यास त्यावर उपचार सुरू करता येतात.

संबंधित बातम्या

Skin Care for Men : पुरुषांनी त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यावी? फॉलो करा ‘या’ टिप्स

Blue veins : तुमच्या हातापायावरही निळ्या नसा दिसतात का? ‘ही’ आहेत त्याची कारणं…

‘या’ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास कमी होईल ऐकण्याची क्षमता