Blue veins : तुमच्या हातापायावरही निळ्या नसा दिसतात का? ‘ही’ आहेत त्याची कारणं…

प्रदीप गरड

|

Updated on: Mar 03, 2022 | 1:47 PM

Blue veins : बर्‍याच लोकांच्या हाता, पायांवर सामान्यपेक्षा जास्त नसा दिसत असतात. या नसांचा रंग हिरवा, निळा किंवा जांभळा असू शकतो. जर एखाद्याला पायावर अशा नसा दिसल्या तर दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते. कारण हे गंभीर आजाराची लक्षणेही असू शकतात.

Blue veins : तुमच्या हातापायावरही निळ्या नसा दिसतात का? 'ही' आहेत त्याची कारणं...
वेरिकोज वेन्स/प्रातिनिधिक छायाचित्र

Blue veins : अनेकदा आपल्या हातावर तसेच पायांवर दाट व गडद रंगाच्या नसा दिसत असतात. परंतु अनेक जण हे सामान्य असल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. अनेकांच्या पायांवर गडद निळ्या रंगाच्या नसा दिसतात. तसेच सामान्यपेक्षा जास्त नसा दिसतात. या नसा हात, छाती, पाय आणि पाठीच्या स्नायूंमध्ये किंवा इतरत्र असू शकतात. पण जर एखाद्याच्या पायावर जास्तच नसा दिसत असतील आणि त्यांचा रंग निळा असेल तर हे गंभीर आरोग्य समस्येचे (Health problems) लक्षण असू शकते. निळ्या नसांना वेरिकोज वेन्स (Varicose vein) असे म्हणतात आणि बहुतेक लोक पायांच्या या नसांकडे सामान्य असल्याचे सांगत दुर्लक्ष करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. तुम्हालाही पायात निळ्या नसा (Blue veins) दिसत असतील तर हा लेखातील माहिती तुमच्या उपयोगी पडू शकते.

निर्माण करू शकतात गंभीर आरोग्य समस्या

अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा प्रामुख्याने हात, पाय, टाच, घोटा आणि पायाची बोटे यांमध्ये दिसतात. ती सुजलेली आणि अधिक वळणदार असतात. त्यांचा रंग निळा किंवा गडद जांभळा असतो. या नसांभोवती ‘स्पायडर व्हेन्स’ असतात. या नसा लाल आणि जांभळ्या रंगाच्या असून त्या दिसायला अतिशय पातळ आणि बारीक असतात. जेव्हा स्पायडर व्हेन्स वेरिकोज वेन्सला घेरतात तेव्हा त्यांना वेदना आणि खाज येते. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा बहुतेक लोकांसाठी धोकादायक नसतात, परंतु काही प्रकरणांमध्ये ते काही गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.

वेरिकोज वेन्सची कारणे

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या नसांच्या भिंती कमकुवत होतात तेव्हा वेरिकोज वेन्स दिसतात. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा रक्तवाहिन्यांमधील दाब वाढतो आणि त्या रुंद होऊ लागतात. यानंतर नसांमध्ये तणाव निर्माण होत असतो. रक्तवाहिनींमध्ये रक्त एका दिशेने वाहून नेणारे व्हॉल्व्ह योग्यरित्या काम करणे थांबवतात. यानंतर, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होण्यास सुरुवात होते आणि नसा फुगणे, वळणे सुरू होते आणि नंतर ते त्वचेवर स्पष्टपणे दिसतात.

‘ही’ आहेत कारणे

1) हार्मोनल इम्बॅलन्स 2) वाढते वय 3) जास्त वजन असणे 4) बराच वेळ उभे राहणे 5) नसांवर दबाव निर्माण होणे

वेरिकोज वेन्सची लक्षणे

फुगलेल्या नसा : फुगलेल्या, सुजलेल्या निळ्या किंवा जांभळ्या नसा हे वेरिकोज वेन्सचे मुख्य लक्षण आहेत. खाज येणे : जर तुम्हाला तुमच्या पायातील नसांभोवती खाज येत असेल तर हे देखील वेरिकोज वेन्सचे लक्षण आहे. पायांना सूज : एखाद्याचे पाय सुजलेले असतील, तर पायाच्या मागच्या भागात निळ्या रंगाच्या नसा असतात, त्यांना वेरिकोज वेन्स असे म्हणतात. वेदना : जर एखाद्याच्या पायांमध्ये, विशेषतः गुडघ्याच्या मागील बाजूस दुखत असेल. तर हेदेखील वेरिकोज वेन्सचे लक्षण आहे. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा बहुतेक लोकांसाठी धोकादायक नसतात, परंतु काही लोकांमध्ये ते गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. उपचार न केल्यास, काही लोकांमध्ये अल्सर आणि रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत रक्त पंप करण्याच्या हृदयाच्या क्षमतेवर परिणाम होतो. याशिवाय ज्या लोकांना वेरिकोज वेन्सची समस्या आहे, त्यांच्या रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्या रक्ताच्या अडथळ्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

‘अशी’ घ्या काळजी

1) नियमित व्यायामाला प्राधान्य द्या. 2) तुमचे वजन जास्त असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा. 3) आहारात फायबरचे प्रमाण जास्त घ्या आणि मीठाचे सेवन कमी करा. 4) उंच टाच आणि घट्ट शूज घालणे टाळा. 5) पाय दुखत असल्यास झोपताना पायाखाली उशी ठेवावी. 6) बराच वेळ उभे राहिल्यास पायांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करा.

आणखी वाचा :

‘या’ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास कमी होईल ऐकण्याची क्षमता

शरीरातील ही लक्षणे वाढत्या कोलेस्ट्रॉलची तर चिन्हे नाहीत? दुर्लक्ष करु नका, अताच सावध व्हा !

Healthy Foods : या पदार्थांचे सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यही सुधारते, जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI