शरीरातलं रक्त लाल, मग तरिही शरीरातील नसा निळ्या का? याचं कारण फारच इंटरेस्टिंग आहे!

आपण नेहमी पाहिले असेल कि,आपल्या शरीरातील नसांचा रंग निळा दिसून येतो. खासकरुन रंगाने जास्त गोरे असणा-या आणि वयोवृध्द लोकांमध्ये, तर मग प्रश्न असा आहे कि, यात लाल रंगाचे रक्त वाहत असते तरी यांचा रंग निळा का असतो? चला तर मग आज जाणून घेवूयात या प्रश्नाचे उत्तर..

शरीरातलं रक्त लाल, मग तरिही शरीरातील नसा निळ्या का? याचं कारण फारच इंटरेस्टिंग आहे!
हाताच्या नसा
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 6:10 PM

तुम्ही ब-याचदा पाहिले असेल कि, नसांचा रंग आपल्याला निळा दिसतो. खासकरुन जास्त गोरे असणा-या आणि वयोवृध्द लोकांमध्ये आपल्याला हा फरक अधिक प्रकर्षाने दिसुन येतो. यातच सर्वात मोठा प्रश्न हा आहे कि, यातून वाहणारे रक्त जर लाल रंगाचे असते तर मग या नसांचा रंग निळा कसा? विज्ञान सांगते कि, नसांचा रंग हा निळा नसतो. मात्र तरिही आपल्याला यांचा रंग निळा का दिसतो, चला तर मग जाणून घेऊयात या प्रश्नाचे उत्तर…

म्हणून नसा निळ्या!

जाणकारांच्या मते हे एक ऑप्टिकल इम्‍यूजन आहे, म्हणजेच हा एक भ्रम आहे. प्रकाशाची किरणे असे होण्यामागचे खरे कारण आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रकाशात सात रंग असतात. यांपैकी जो कोणताही रंग एखाद्या गोष्टीवर पडून परावर्तित होतो, तोच रंग आपल्याला दिसून येतो.

जसं की एखादी वस्तू प्रकाशाच्या सातही किरणांना परावर्तित करते तेव्हा ती आपल्याला पांढरी दिसून येते आणि जी वस्तू या सगळ्या किरणांना अवशोषित करते ती आपल्याला काळी दिसून येते. किरणांच्या परावर्तनाचा हा सिध्दांत नसांच्या बाबतीतही लागू होतो.

नसांमध्ये लाल रंगाचे रक्त वाहत असते, या पध्दतीने विचार केला तर ते लाल रंगाचेचे दिसून यायला हवे. मात्र असे होत नाही, विज्ञानानुसार प्रकाशाच्या किरणांमध्ये सात रंग असतात. त्यामुळे ज्यावेळेस प्रकाशाची किरणे नसांवर पडतात त्यावेळी लाल रंगाची किरणे अवशोषित म्हणजे एब्‍जॉर्ब होतात. याचवेळी किरणांमध्ये असणारा निळा रंग अवशोषित होत नाही तर तो परावर्तित होतो. याच कारणामुळे आपल्याला नसा निळ्या रंगाच्या दिसून येतात.

रंगामागचं ‘रिझन’…

विज्ञानानुसार किरणांचा जो रंग परावर्तित होत असतो तोच रंग आपल्याला दिसून येतो. हे आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. जसे कि समुद्राच्या पाण्याचा रंग पारदर्शी असतो, मात्र दूरवरुन पाहिल्यानंतर तो आपल्याला निळा दिसून येतो. दिवसा जेव्हा सुर्याची किरणे पाण्यावर पडतात त्यावेळेस प्रकाशातून निघणा-या दुस-या रंगांच्या किरणांना पाणी एब्‍जॉर्ब करते, मात्र निळ्या रंगाच्या किरणांना परावर्तित (रिफलेक्‍ट) करते. प्रकाशाच्या याच परिवर्तनामुळे समुद्राचा रंग आपल्याला निळा दिसून येतो, पण प्रत्यक्षात तो निळा नसतो.

रक्त लालच का असतं?

रक्त लाल रंगाचे का असते, हे सुध्दा समजून घेवूया. रक्तामध्ये हिमोग्लोबीन असल्यामुळे याचा रंग लाल असतो. हे एक प्रकारचे प्रोटीन असते जे आयरन आणि प्रोटीन यांच्यापासून तयार होत असते. याउलट काही जीवांमध्ये रक्त लाल किंवा हिरव्या रंगाचे सुध्दा पाहायला मिळते. जसे कि ऑक्‍टोपसच्या रक्ताचा रंग हा निळा असतो. त्याच्या रक्तात असणा-या निळ्या रंगाच्या हीमोसायनिन प्रोटीनमुळे आपल्याला त्याच्या रक्ताचा रंग निळा दिसून येतो.

इतर बातम्या –

लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम

Retirement Rights Day | चला, जाणून घेऊयात, निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार…!

रेल्वेत मध्यभागीच का असते AC बोगी; सर्वसाधारण डब्बा का असतो एकदम सुरुवातीला अथवा मागच्या बाजूला?

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.